पान:ज्योतिर्विलास.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उल्का . १६३ सून चोहीकडे उल्का जातात असे दिसले. त्यांचे उद्गमस्थान आणि गमनमार्ग चित्रांक १४ यांत दाखविला आहे... आगष्टच्या ९, १०, ११, तारखांच्या सुमारास बहुधा दरसाल उल्कावृष्टि होते. आकाश स्वच्छ असले तर हजारो उल्का पडतांना आढळतात. इ० सन १८७२ मध्ये नवंबरच्या २७ व्या तारखेस व इसवी सन १८८५ मध्ये त्याच तारखेस उल्कावृष्टि झाली. यांतील दुसरीबद्दल उल्लेख वर आलाच आहे. ही वृष्टि आगष्टच्या वृष्टीपेक्षा मोठी असते. याप्रमाणे नियमित काळाने ह्या निरनिराळ्या ३ उल्कावृष्टि होतात. शिवाय तारखि ९।१० अप्रील, जुलै ता० २५ पासून ३०, आक्टोबर ता० १६ पासून २३ व दिसेंबर ता०६ पासून १३ या वेळी दरसाल थोडथोडी वृष्टि होते. आतां आपण अशनिपाताचा इतिहास पाहूं. हा पात उल्कापातासारखा नियमित काळाने होतो असे दिसून येत नाही. व त्याप्रमाणे हा अगण्य असतो असेंही नाही. तथापि अनेक ठिकाणी पुष्कळ वेळां शेकडो पाषाण पडलेले आहेत. . आकाशांतून दगड पडतात हे प्रथम काही लोकांस खोटे वाटत असे. परंतु शास्त्रीयरीत्या शोध व विचार होऊन सांप्रत ती गोष्ट निर्विवाद खरी ठरली आहे. चिनी लोकांच्या इतिहासांत उल्कापाताचे वर्णन इ० सनापूर्वी ६८७ पासून व अशनिपाताचे इ० सनापूर्वी ६४४ पासून आहे. ग्रीक, आरव यांच्या प्राचीन ग्रंथांत अशनिपाताची वर्णने पुष्कळ आहेत. अशनिपाताच्या वेळी काय काय प्रकार घडतात वगैरे गोष्टी समजण्याकरितां गेल्या ४०० वर्षांतली अशनिपाताची कांही विश्वसनीय वर्णने देतो. इ० सन १५१० मध्ये इताली देशांत लांबर्डी प्रांतांत एके दिवशी सायंकाळी ५ वाजतां ११२० दगड आकाशांतन पडले. ते गारपेक्षा कठिण होते; आणि त्यांस गंधकासारखा वास येत होता. त्यांत मोठा होता त्याचे वजन १२० पौंड होते. इ. सन १६२० मध्ये पंजावांत जालंदर येथे एक अशनि पडला त्याचा वत्तांत जहांगीर बादशाहाने स्वतः लिहिला आहे. तो म्हणतो की त्याचे वजन १६० तोळे होते. त्याची हत्यारे बनविण्याकरिता मी तो एका कारागिराच्या जवळ दिला. त्याने सांगितले की त्याचे लोखंड घनवधनीय नाही. तेव्हां दूसरे लोखंड मिसळण्यास मी सांगितले. तेव्हां अशनीचे लोखंड ३भाग व इतर लोखंड १ भाग असें एकत्र करून त्याच्या २ तरवारी, १ सुरी व १ खजार अशी हत्यारे केली." ३० स० १७९० मध्ये नवंबरच्या २४ वे तारखेस रात्री ९ वा देशांत पिरिनिज पर्वताजवळ एका गांवीं एक मोठी उल्का आकाशांत दिसली. ती चंद्राहून मोठी होती. तिचा चांगला प्रकाश पडला होता. तिला सुमारे दोन • * जहांगीर बादशाहाच्या मळ फारशी लेखांत व फेरिस्ता याने याबद्दल वर्णन केले स्यांत अशान' या अर्थाचे शब्द आहेत. अशनिहत शिळातळ जळ...वी' या मोग: पद्यांत हा शब्द आला आहे. का की, या मोरोपंताच्या