पान:ज्योतिर्विलास.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पान का पालन न मिल ज्योतिर्विलास. तीन अंश लांबीचे शेपूट होतें. ते शेवटाकडे निमुळते व लाल होते. उरकेचा रंग फिकट पांढरा होता. ती मोठ्या वेगाने दक्षिणेकडून उत्तरेस जाऊन सुमारें २ सेकंदांत फुटली, व तिचे लहान भाग होऊन नाहीसे झाले. त्यांतले कांहीं भाग तांबडे होते. सुमारे दोन मिनिटांनी तोफेपेक्षाही भयंकर गर्जना ऐकू येऊ लागली. त्या धक्क्याने खिडक्यांची तावदानें हालूं लागली. फळ्यांवर ठेवलेली भांडी पडली. सुमारे ४ मिनिटें गर्जना झाली. हवेत जिकडे तिकडे गंधकाचा वास सुटला. सरासरी २ मैल व्यासाच्या वर्तुळप्राय जागेत पुष्कळ दगड पडले. त्यांतले काही २० पौंड वजन होते. एक तर ५० पौंड वजन होता. त्या दृष्टीने काही घरें पडली. घरांवर दगड पडले तेव्हां एकादा मऊ पदार्थ पडावा तसा त्यांचा आवाज झाला. इ० स० १७९८ मध्ये दिसेंबरच्या १९व्या तारखेस रात्री ८ वाजता आपल्या देशांत काशी येथे एक मोठी उल्का दृष्टीस पडली. ती पूर्णचंद्राप्रमाणे तेजस्वी होती. ती फुटून मोठा आवाज झाला; व तेथून १४ मैलांवर पुष्कळ दगड पडले. त्यांवर कांहीं काळं आवरण होते. दगड फोडून त्यांचा काही भाग व मुख्यतः तें आवरण लोहचुंबकाजवळ नेले असतां ओढले गेले. दगडांच्या पोटांत पांढुरक्या पदार्थात लहान वाटोळे काळे गोळे होते. व ते दगडांच्या बाकीच्या भागापेक्षां कठिण होते. इ० स० १८०३ च्या अप्रिलच्या २६ व्या तारखेस फ्रान्स देशांत नामडी प्रांतांत मोठी अशनिवृष्टि झाली. बायो नामक प्रसिद्ध विद्वानाने सरकारच्या हुकुमावरून त्याबद्दल चौकशी करून हकीकत लिहिली आहे. त्या दिवशी दोन प्रहरी एक वाजतां हवा स्वच्छ असतां एक तेजःपुंज उल्का आकाशांत दिसली. ती मोठ्या वेगाने आग्नेयीकडून वायव्येस गेली. काही सेकंदांनी भयंकर गर्जना झाली. ती सुमारे ५।६ मिनिटें होत होती. व आसपास ९० मैल प्रदेशांत ऐकू गेली. प्रथम तोफेसारखे ३।४ आवाज झाले. पुढे झपाट्याने बंदुकी झडाव्या तसा शब्द झाला. व मग नगारा वाजवावा त्याप्रमाणे नाद ऐकू आला. ही गजना एका लहानशा ढगांत होत होती. तो काटकोनचौकोनाकति होता. त्याची लांब बाज़ बहुधा पूर्वपश्चिम होती. गर्जना होत असतां तो ढग स्थिर होता. सुमारे ३ मैल प्रदेशांत तो अगदी डोक्यावर दिसला. व तेथे गोफणीतून धोंडा फेंकतांना आवाज होतो, तसा आवाज ऐकू आला. व तेथेच सुमारे २॥ मैल लांब व १ मैल रुंद अशा दीर्घवर्तुळाकृति प्रदेशांत दगडांची वृष्टि झाली. ह्या जागेची लांबी आग्नेयीकडून वायव्येकडे होती; व ती अगदी लोहचुंबकाच्या याम्योत्तरवृतांत होती, हा चमत्कार आहे. मोठाले दगड सुमारे १७ पौंड वजन होते. . ते आग्नेयीकडे पडले. व पुढे वायव्येकडे लहान लहान दगड पडत गेले. एकंदर सुमारे ३००० दगड पडले, पडले तेव्हां ते फार तापलेले होते. पुढे काही दिवस ते दिसूळ होते. मग कठिण झाले.