पान:ज्योतिर्विलास.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शनि. १५३ नत्रपणे शनीभोवती फिरत आहे. त्यांच्या कमजास्त दाटीमुळे वलये कमजास्त तेजस्वी दिसतात. जेथे ते फार दाट आहेत व दक्षिणोत्तर भागी कांहीं मैलपर्यंत पसरले आहेत तेथें वलये चकचकित व अपारदर्शक दिसतात. व जेथे ते विरल आहेत व त्यांचा थर अगदी पातळ आहे तेथे ती तेजोहीन व पारदर्शक दिसतात. अशा प्रकारचे हे शनीचे राज्य आहे. तेव्हां शनि हा सूर्याची गुरूहूनही महत्त्वाची प्रतिमा आहे. आमच्या लोकांनी शनि हा सूर्याचा पुत्र मानिला आहे ते यथार्थ दिसते. असा हा पुत्र सूर्याने कशाकरितां निर्माण केला ह्याचा विचार करितां, शनीवर वस्ती आहे की नाही याविषयी मागे जी प्रमाणे दाखविली आहेत ती एका बाजूस ठेविली तरी, शनीचा उपयोग त्याच्या परिवारास असला पाहिजे किंवा परिवाराचा उपयोग त्यास असला पाहिजे, ह्या दोहोंपैकी कोणती तरी गोष्ट आपल्यास कबूल केली पाहिजे. सर्व उपग्रह एकदम पूर्ण प्रकाशित असले तरी आपल्या पूर्णचंद्रापासून जो प्रकाश आपल्यास मिळतो त्याचा फक्त सोळावा हिस्सा प्रकाश त्यांपासून शनीला मिळेल. सूर्यापासून ८८ कोटी मैलांवर म्हणजे पृथ्वीच्या सुमारे ९॥ पट अंतरावर शनि आहे. तेव्हां आपल्याला जो प्रकाश मिळतो त्याच्या ९० वा हिस्सा शनीला मिळतो. बाकी ८९ हिस्से सूर्याचा प्रकाश कमी मिकतो. त्याचा मोबदला ह्या चंद्रांच्या चांदण्याने कितीसा मिळणार वलयांविष" विचार केला तर शनीवरच्या हिवाळ्यांत दिवसास ती सूयाच्या आड यऊन शनीच्या बऱ्याच प्रदेशावर काळोख पाडितात. व तो काळाख काही ठिकाणी तर आपल्या १०।१२ वर्षे असतो. अर्थात हिवाळा जास्तच कडक होतो..तेली रात्रीसही त्यांचा प्रकाश पडत नाही. उन्हाळ्यांत मात्र ता सूयाच्या आड येत नाहीत व रात्रीस त्यांचे चांदणे पडते. परंतु तेव्हां त्याचा विशेष उपयोग नाहीं दुसऱ्या पक्षी पाहिले तर शनीपासून त्याच्या पारवारासत झालेला पप्कळ प्रकाश मिळतो. व शनीच्या अंगचाही काहान काही प्रकाश मिळत असेल. ते गुरूच्या परिवाराप्रमाणे शनीच्या उपग्रहांवरही प्राणा प्राणी असावे असें अनुमान हो आणि जो शनि आपल्या आकर्षणाने आपल्या परिवा परिवाराचा नियंता आहे तो त्या माणि त्यावरील प्राण्यादिकांचा पोषण करणारा पषा ही असला पाहिजे. GENERAL NAIIWA सार्वजनिक हवाला खेड, (मु.)