पान:ज्योतिर्विलास.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. विषुववृत्ताच्या दिशेत आहेत. अर्थात् त्यांचाही कक्षेशी इतका कोन आहे. यामुळे पृथ्वीवर सूर्य जसा वर्षांत दोन वेळां विषुववृत्तावर येतो त्याप्रमाणे शनीच्या वर्षांत म्हणजे आपल्या २९।। वर्षांत सूर्य दोन वेळां त्याच्या विषुववृत्तावर येतो, तेव्हां सूर्यावरून पहाणारास कागदाच्या कडेप्रमाणे ह्या वलयांची कडा दिसते. म्हणजे शनीच्या विषुववृत्तांत वलयांच्या जागी एक सरळ रेषा दिसते. व बहुधा त्याच वेळी पृथ्वीवरून पाहणारास तशीच रेषा दिसते. त्या वेळी सामान्य दुर्बिणीतून वलये मुळीच दिसत नाहीत. शनीचा मंदस्पष्ट ( सूर्यावरून दिसणारा) भोग १७२ अंश किंवा ३५२ अंश असतो तेव्हां म्हणजे सांप्रत तो सुमारे पूर्वा आणि उत्तरा किंवा पूर्वाभाद्रपदा आणि उत्तराभाद्रपदा यांच्या सुमारास असतां अ. शी स्थिति असते. गेल्या ( इसवी सन १८९२ ) सालाच्या आरंभी काही महिने वलये मुळीच दिसत नव्हती म्हटले तरी चालेल. परंतु ३० वर्षांत अशी स्थिति थोडेच महिने असते. शनीचा मंदस्पष्ट भोग (२ किंवा २६२ अंश असतो तेव्हां म्हणजे तो मृग किंवा मूळ या नक्षत्रांच्या सुमारास असतो, तेव्हां वलये पाहण्याची चांगली संधि असते. तेव्हां ती चित्रांक १३ यांत दाखविल्याप्रमाणे रुंद दिसतात. इ० स० १८९९ मध्ये अशी संधि येईल. व पुढे सुमारे दर १४॥ वर्षांनी येईल. या संधीच्या पूर्वी व नंतरही एक दोन वर्षे ती बरीच रुंद दिसतात. शनि उत्तरगोलार्धात असतो, तेव्हां वलयांचा दक्षिणचा पृष्ठभाग आपल्यास दिसतो; आणि तो दक्षिणगोलार्धात असतो तेव्हां वलयांचा उत्तरचा पृष्ठभाग दिसतो. शनीची वलये आणि पहिले सात उपग्रह यांच्या कक्षा एका पातळीतच आहेत असे म्हटले तरी चालेल. यामुळे वलयांची जेव्हां केवळ एक रेषा दिसते तेव्हां ते उपग्रह पाहण्याची चांगली संधि असते. आणि तेव्हां मालेत माण विल्याप्रमाणे ते फार मौजेचे दिसतात. याच संधीस केव्हां केव्हां असा योग येतो की, पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये वलये येतात. तेव्हां तर ती पाहण्याची फारच मौज असते. वलयांप्रमाणे अगदी आंतल्या तेजोहीन वलयाचा शोध इ. सन १८५० या वर्षी लागला. तें बहुधा पारदर्शक आहे. त्यांतून शनीचा पृष्ठभाग दिसतो. बाकीची वलये अपारदर्शक आहेत. तरी त्यांची जाडी सर्वत्र सारखी नाही. बाहेरच्या चकचकित वलयाचे २ भाग असावे असे दिसते. त्यांत बाहेरून तिसरा हिस्सा रुंदीवर काळ्या रंगाची छाया आहे.. वलयांत इतर भागीही कधीकधी अशी छाया दिसते. यावरून तेथील वलयाचा भाग काही काळ विरल होऊन पुनः दाट होत असावा. आंतल्या चकचकित वलयाची रुंदी दिवसेंदिवस वाढत असावी व तें शनीच्या पृष्ठभागाच्या जवळ जवळ येत असावे असे काही ज्योतिष्यांचे अनुमान आहे. सगळ्या सूर्यमालेत एकट्या शनीभोवती असणाऱ्या ह्या चमत्कारिक वलयांच्या शारीरघटनेविषयी असा निर्णय हल्ली ठरला आहे की, अति लहान अशा कोट्यावधि उपग्रहांच्या योगाने ही वलये झाली आहेत. आणि ते उपग्रह परस्परांशी फार निकट असल्यामुळे ते निरनिराळे दिसत नाहीत. त्यांतील प्रत्येक उपग्रह