पान:ज्योतिर्विलास.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. युरेनस आणि नेपचुन्. (प्रजापति आणि वरुण.) - - - -- जिज्ञासा ही एक विलक्षण गोष्ट आहे. मनुष्याला जिज्ञासा नसती तर तो ज्या उच्चावस्थेस आज पोंचला आहे, ती त्याला प्राप्त झाली नसती. प्रयोजनावांचन कोणत्याही कार्यास मनुष्य प्रवृत्त होत नाही, ही गोष्ट तर खरीच. परंतु ह्या स्वार्थाच्या मनोवृत्तीबरोबर जिज्ञासा ही मनोवृत्ति नसती तर मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ म्हणणे शोभलेंच नसते. युरोप, अमेरिका या खंडांत ज्योतिषज्ञान जें तके वाढले. त्यास मूलकारण नौकागमन हे होय. आमचे त्यावांचून कांहीं आ नव्हते. यामुळे आमचें ज्योतिषज्ञान पाश्चात्यांच्या मागे राहिले. तथापि केवळ नौकागमनाच्या आवश्यकतेमुळेच युरोपांत व अमेरिकेंत ज्योतिषसंबंधे नवीन शोध लागले असे नाही. चंद्राची गतिस्थिति बरोबर समजून त्याचे व तारांचे सामान्य वेध घेतां आले आणि पृथ्वीची माहिती असली, म्हणजे अफाट समुद्रांतून नौका पाहिजे तिकडे नेण्याचे काम सामान्य क्यापटन करूं शकेल. त्यास न्यूटन किंवा केप्लर नको; किंवा ग्रह, तारा हे काय पदार्थ आहेत इत्यादि ज्ञानाची जरूरी नाही, परंतु मनुष्य एकदां कोणत्याही कामी लागला म्हणजे जिज्ञासा त्यास पुढे नेते. ज्याला ग्रह किंवा एकादी तारा ठाऊक नाही अशाही मनुष्याने एकादे वेळी आकाशांत एकही तेजस्वी तारा किंवा ग्रह पाहिला तर तो विचारतो की, हा कोण आहे हो? मला तर असा अनुभव पुष्कळ आहे; व वाचकांपैकी पुष्कळांस असेल. इतर तारांहून बुधशुक्रादि पांच तारा कांही निराळ्या आहेत, त्यांस गति आहे, म्हणजे ते ग्रह आहेत, हे मनुष्यास समजणे हे त्याच जिज्ञासेचे फल होय. मनुष्योत्पत्तीनंतर बराच काळ हे ज्ञान होण्यास लागला असेल. ते प्रथम कोणास झाले हैं समजणे तर राहिले, परंतु प्रथम कोणत्या राष्ट्रांत झाले, हेही आतां ठाऊक नाही. मग ते कधी झाले हे कोठून समजणार ? शक्रादि पांच ग्रह ज्याने पाहिले आहेत, त्यास सांगितले की, त्यांसारखेच आणखी दोन ग्रह आकाशांत दिसतात. तर त्यास आश्चर्य वाटून तो लागलाच म्हणेल की, कोठे आहेत, दाखवा. जर ते गुरुशुक्रांसारखे तेजस्वी दिसले तर त्यास मोठा आनंद होईल. असे २ ग्रह आहेत. ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत खरे तरी सदरहु मनुष्यास ते प्रत्यक्ष पाहून आनंद झाला असता तसा आनंद दुर्बिणी ते पाहन ज्योतिष्यांस होतो. इ. सन १७८० पर्यंत ते माहीत नव्हते, पुढे त्यांचा शोध लागला. " ल नामक एक प्रख्यात ज्योतिषी इंग्लंदांत होऊन गेला. त्याचे नांव माणे आलेच आहे. तो स्वतः दुबिणी करीत असे. आकाशाच्या निरनिराळ्या भावारा किती दिसतात, इत्यादि गोष्टींसंबंधे त्याचे महत्त्वाचे शोध चालले होते.