पान:ज्योतिर्विलास.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शनि. वाजस सुमारे २३ लक्ष म्हणजे दोहों बाजूं मिळून ४६ लक्ष मैल इतक्या प्रदेशांत र भवनें त्या भोवती फिरतात. त्यांतला जो लोक अगदी लहान आहे त्याचा व्यास १००० मैल आहे. आणि सर्वात मोठा आहे तो तर बुधापेक्षा मोठा आहे. कदाचित् मंगळा एवढाही असेल. ह्या आठ उपग्रहांपैकी सर्वांत मोठ्या उपग्रहाचा शोध इ० सन १६६५ मध्ये लागला. पुढे १६८४ पर्यंत ४ उपग्रह सांपडले. त्यांचा शोध एका फ्रेंच ज्योतिष्याने एकट्याने लाविला. पुढे १०० वर्षांनंतर हर्शलने २ उपग्रह शोधून कादिले. आणि सर्वात धाकटा इ० सन १८४८ मध्ये सापडला. हे उपग्रह आपल्यापासन फार लांब असल्यामुळे अगदी बारीक दिसतात. मोठा, आठव्या प्रतीच्या तारेरक ढा दिसतो. काहीं तर शेवटल्या प्रतीच्या तारांएवढे दिसतात. अर्थात् हे दुबिणीवांचून दिसत नाहीत. ह्या उपग्रहांच्या कक्षा आणि शनीची कक्षा होगाय समारे २८ अंशांचे कोन आहेत. यामुळे यांची ग्रहणे वगैरे फार क्वचित् होतात. अगदी आंतला उपग्रह शनीपासून १२० हजार मैलांवर आहे. त्याच्या आंत शनीची वलये आहेत. त्यांचे वास्तविक स्वरूप सन १६५५ ह्या वर्षी कळलें. ह्या वलयांत दोन वलये चकचकित आहेत. ( अंक १३ चे चित्र पहा). त्याच्या आंतले तिसरें तेजोहीन आहे. बाहेरच्या वलयाच्या बाहेरच्या कडेचा व्यास सुमारे १६७ हजार मैल आहे व आंतल्या कडेचा १४७ हजार मैल आहे. म्हणजे ह्या वलयाची रुंदी १० हजार मैल आहे. त्याची बाहेरची कडा शनीच्या मध्यबिंदूपासून ८३॥ हजार मैलांवर आहे. ह्या वलयाच्या आंत १७०० मैल रुंदीची जागा असून तिच्या आंत दुसरें चकचकित वलय सुमारे १७॥ हजार मैल 5दीचे आहे. त्याच्या आंत ८|| हजार मैल रुंदीचें तेजोहीन वलय आहे. व त्याच्या आतल्या कडेपासून शनीच्या पृष्ठभागापर्यंत सुमारे १०००० मैल रुंदीची जागा रिकामी आहे. तिच्या आंत ७२ हजार मैल व्यासाचा शनिगोल आहे. ह्या वलयांचा परिघ आणि रुंदी ह्यांच्या मानाने त्यांची जाडी फारच थोडी आहे. ती बहुधा १०० मैलांच्या आंतच असावी. ही वलये शनीच्या विषुववृत्ताभोंवती म्हणजे पर्वपश्रिम पसरलेली आहेत. मागे आपण स्वसांत ( ११) पाहिल्या माणे ३५ इंच व्यासाच्या शनिगोलाभोंवती ५ इंच जागा सोडून पाहिल्याम व्यासाचे एक कागदाचे वर्तळ कापन लाविले व त्याच्या परिघाची रुंदी तर त्यावरून शनीच्या वलयांची कल्पना मनांत येईल. हे कागदाचे वर्तुळ शनीला कोठेही न लागेल असे आपल्यास ठेवितां येईल काय ? परंतु आकाशांत तर हा वलयप्रदेश शनीला कोठेही लागलेला नाही. तरी शनि सूर्याभोवती फिरत असतां ह्या वलयांचे स्थान शनीच्या संबंधे अगदी पालटत नाही. जसा काय तो एक शनीचा अवयव आहे, अशा रीतीने ती त्याबरोबर असतात. पृथ्वीच्या कक्षेचा विषुववृत्ताशी २३॥ अंशांचा कोन आहे त्याप्रमाणे शनी. च्या कक्षेचा त्याच्या विषुववृत्ताशी सुमारे २७ अंशांचा कोन आहे. आणि वलये त्या वलयांत वलये आहे.पग्रह शनीपा यांची यहाण शनीची