पान:ज्योतिर्विलास.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शनि. १४७ १८९५ आक्टोबर १३ अस्त पश्चिमेस. 1 नोव्हेंबर १८ उदय पूर्वेस. पुढे २॥ महिने पहाटेस पूर्वार्धी दिसेल. शनीच्या अमाप्रदक्षिणेचा काळ ३७८ दिवस आहे. यामुळे त्याचे षड्भांतर, त्रिभांतर, वक्रत्व, मार्गित्व, अस्त, उदय, यांच्या एकदांच्या वेळेत १ सौरवर्षे आणि १३ दिवस मिळविले म्हणजे त्या गोष्टींची पुढली वेळ निघते. शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास सुमारे २९|| वर्षे लागतात. इतक्या काळांत तो १२ राशि फिरतो. म्हणजे प्रत्येक राशीला तो सुमारे २॥ वर्षे असतो. आणि एका राशीला तो असतां तिच्या मागच्या व पुढच्या राशीस पीडा करितो अशी समजूत आहे. अर्थात् एकेका राशीला शनीची ही बाधा साडेसात वर्षे असते. एका मनुष्याची राशि वृषभ आहे अशी कल्पना करा. तर मेष राशीला शनि येतांच वृषभ राशीस साडेसाती सुरू होते. ती वृषभ आणि मिथुन राशि क्रमून कर्क राशीत शनि जाई तोपर्यंत असते. - आपली सुमारे २९॥ वर्षे होतात तेव्हां शनीचें वर्ष होते. आपली २॥ वर्षे होतात तेव्हां कोठे त्याचा एक महिना होतो. इतका शनि मंद आहे. तेव्हां त्याला 'मंद' असें नांव आहे ते यथार्थच आहे. डोळ्यांनी दिसणाऱ्या ग्रहांत इतका मंद दुसरा कोणी नाही. तो वक्री होतो तेव्हां त्याच्या मंदपणाची कमाल होते. तो एकाच ठिकाणी पुष्कळ काळ घोटाळत असतो. तारीख १३- नोव्हेंबर सन १८९२ रोजी तो आप तारेजवळ आला; तरी पुढे ९ महिन्यांनी आपला पुन्हां तेथेच. तसेंच १८ नोव्हेंबर १८९३ रोजी चित्रा तारेजवळ येईल. आणि पुन्हां ९ महिन्यांनी पहाल तो पुन्हा तेथेच असेल. याप्रमाणे याचे मंदत्व आहे. तेजाविषयी पाहिले तरी हाच प्रकार. गुरु आणि शुक्र यांच्या तेजापुढे तर याचे तेज कांहींच नाही. परंतु मंगळ, बुध हे ग्रह देखील बहुधा नेहमी याच्याहून तेजस्वी दिसतात. पायाचा जड, तेजानें हीन, तर मग स्वभावाने कसा असेल ह्याविषयी सहज अनुमान होते. मागेपुढे जाऊन येऊन एकेका नक्षत्राची पिच्छा पुरविणारा हा काळापिंगळा निस्तेज ग्रह बराच काळ एकाच राशीस असतो, तेव्हां तो कांही तरी अनिष्ट करील असे साहजिकच प्राचीन लोकांच्या मनांत आले. शनि हा खलग्रह आहे अशी सर्व देशांत फार प्राचीनकाळापासून समजूत आहे. कौरवपांडवयुद्धाच्या वेळी तो रोहिणीजवळ होता; आणि तेणेकरून जगाला अनिष्ट आहे असे सुचवीत होता; असे वर्णन आहे. तो रोहिणीशकटाचा भेद करील तर कसा प्रलय उडेल याविषयी वर्णन मागे आलेच आहे. (पृ० ३१)-सांप्रत तो शकटभेद करीत नाही हे आपलें केवढे सुदैव आहे ! प्राचीन युरोपियन लोकांनीही क्रूर, मंद आणि अविवेकी अशा सॅटर्न ( Saturn ) नामक देवतेचें नांव याला दिले आहे. परंतु केवळ डोळ्यांनी दिसणाऱ्या बाह्य स्वरूपावरून वस्तूची परीक्षा करण्यांत आपण कधी कधी किती चुकतो हे आकाशस्थ ज्योतीच्या अवलोकनाने चांगले समजतें.. येथून आपणास शनि अगदी मंद दिसतो. परंतु तो आपल्या कक्षेत