पान:ज्योतिर्विलास.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. दर सेकंदास ६ मैल म्हणजे मिनिटांत ३६० मैल चालतो. अति वेगाने चालणारी आगगाडी फार तर याच्या शतांश चालेल. शनीची स्व-परिभ्रमगतिही अशीच झपाट्याची आहे. शनीवर स्थाईक-खुणा बहुधा काहीच दिसत नाहीत. कधीकधी दिसणाऱ्या एकाद्या ठिपक्यावरून ही गति साधारणपणे काढिली होती. परंतु इ० स० १८७६ साली दिसलेल्या एका पांढऱ्या तेजस्वी ठिपक्यावरून अक्षप्रदक्षिणाकाळ सूक्ष्मपणे काढिला आहे. शनीच्या दैनंदिन प्रदक्षिणेस १० तास १४ मिनिटे लागतात. म्हणजे शनीवर अहोरात्र काय तें सुमारे १० तासांचे आहे. इतक्या वेळांत तो स्वतःभोवती एक फेरा करितो. तेव्हां त्याच्या विषुववृत्तावरचा प्रत्येक बिंदु दर सेकंदास सुमारे ६ मैल चालतो. हे त्याच्या गतीविषयी झाले. त्याच्या स्वरूपाविषयी म्हणाल तर आकाश स्वच्छ असतां एकाद्या काळोख्या रात्री शनीकडे मोठी दुर्बीण लावून पहा. . म्हणजे ज्याची कल्पनाही नाही असे विलक्षण चित्र दिसेल. त्यांत एक भव्य गोल आहे, त्याच्या पृष्ठभागावर नानाप्रकारचे रंग चमकत आहेत, ध्रुवाकडे निळा रंग आहे, इतर भागी पिवळा आहे, मध्यभागी एक पांढरा पट्टा आहे, व मध्ये मध्ये चमकारिक ठिपके असून त्यावर पिंगट, जांभळा, तांबुस अशा रंगांची झाक मारीत आहे, असे आढळून येईल. परंतु या चित्रांतला ह्याच्यापेक्षाही विलक्षण प्रकार निराळाच आहे. शनि पहात असतां आपण महादेवाची पिंडीच पाहत आहों की काय, असें तुम्हांस वाटेल. लिंगाभोंवतीं शाळुकेचे वेष्टन लागलेले असते. शनीभोंवतालची कडी त्यास लागलेली नाहीत. आणि ते एकच कडे नसून त्यांत निरनिराचित्रांक १३-वलयांकित शनि. की वलये आहेत. ह्यांचा रंग चित्रविचित्र दिसतो. त्यांतले आंतले वलय तर आकाशस्थ तेजांत अद्वितीय आहे. कधी कधी तें लख्ख जांभळे दिसते. आणि ते मध्ये असले तरी त्यांतून पलीकडचा शनिगोलाचा पृष्ठभाग दिसतो. अंक १३ च्या चित्रावरून शनीचे स्वरूप समजेल. दर्बिणींतन शनि मोठा दिसला तरी त्यावरूनही त्याच्या महत्त्वाची वास्तविक कल्पना होणार नाही. त्याच्या पूर्वपश्चिम व्यासापेक्षां दक्षिणोत्तर व्यास सुमारे दहावा हिस्सा म्हणजे सुमारे साडेसात हजार मैल कमी आहे. ह्यामुळे त्याचा आ