पान:ज्योतिर्विलास.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लघु ग्रह. १३७ लघु ग्रह. मंगळाच्या पलीकडे मोठा ग्रह गुरु हा आहे. परंतु मंगळ आणि गुरु यांच्या मध्ये नुसत्या डोळ्यांनी न दिसणारे असे काही लहान ग्रह आहेत. त्यांचे थोडेसे वर्णन करूं. नेपचुन् खेरीज करून बाकी ग्रहांची सूर्यापासून अंतरें कांही एका नियमाने आहेत. ३, ६, १२, अशी एक श्रेढी घ्यावी. हींतील संख्या दुपटीने वाढत जातात. बुधाचे अंतर ४ मानून पुढे ४ हीच संख्या श्रेढीतील संख्यांत मिळवीत जावे; म्हणजे ज्या संख्या होतात त्यांच्या प्रमाणांत ग्रहांची अंतरे आहेत. टिटिअस ह्यानें इ० स० १७७२ मध्ये हा नियम शोधून काढिला; आणि तो बोड ह्याने प्रसिद्धीस आणिला. ग्रह. टिटिअसची अंतरें. वास्तव अंतरें. फरक. (पृथ्वीचे १० मानून ) बुध ७.२ -४.२ शुक्र ३+४=७ पृथ्वी ६+४=१० मंगळ १२+४=१६ १५.२ -.८ लघुग्रह २४+४-२८ २० ते ३५ गुरु ४८+४=५२ ५२ शनि ९६+४=१०० ९५.४ युरेनस १९२+४=१९६ १९१८ नेपचन- ३८४+४=३८८ ३००.५ -८७.५ नेपचनचे अंतर ह्या नियमाला अनुसरून नाही. परंतु त्याचा शोध लागण्यापूर्वी हा नियम खरा वाटत होता; व मंगळ आणि गुरु ह्यांचे अंतर इतर ग्रहांमधील अंतराच्या मानाने फार आहे; म्हणून ह्या दोघांच्या मध्ये एकादा ग्रह असावा अशी केप्लरच्या वेळेपासून ज्योतिष्यांस शंका होती. त्या ग्रहाचा शोध लावण्याकरितां इ० स० १८०० मध्ये २४ वेध करणारांची एक कमिटी नेमली. परंतु तिचे काम सुरू होण्यापूर्वीच इ० स० १८०१ जानुआरीच्या पहिल्या तारखेस पियाझी नामक एका ज्योतिष्यास एका ग्रहाचा शोध लागला. त्याचे नांव त्याने सिरिस असें ठेविलें. १८०२ मध्ये पालास याचा शोध आलबर्स याने लाविला. त्याला असे वाटले की पूर्वी मंगळ आणि गुरु ह्यांच्या मध्ये एक मोठा ग्रह असावा, व तो फटून त्याचे तुकडे हे लघु ग्रह झाले असावे; व हे मत खरें असेल तर शोध लागलेल्या दोन ग्रहांच्या कक्षांच्या छेदनबिंदूजवळ शोध ठेविला असतां आणखी लघुग्रहांचा शोध लागेल. त्याप्रमाणे १८०४ मध्ये जूनोचा शोध लागला. परंतु १८०७ मध्ये आलबर्स ह्यास वेस्ता ह्या चवथ्या ग्रहाचा शोध