पान:ज्योतिर्विलास.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ས ལོ་ ज्योतिर्विलास. लागला, त्याची कक्षा त्यास वाटलेल्या नियमास अनुसरून नाही. पुढे ३८ पति लघुग्रह मुळीच सांपडले नाहीत. परंतु त्यापुढे १८४५ पासून एकादा लघग्रह सांपडला नाही असें वर्षच गेले नाही. अलीकडे पूर्वीपेक्षा मोठमोठ्या दुर्बिणी निघाल्या आहेत; यामुळे उत्तरोत्तर नवीन सांपडणाऱ्या ग्रहांची संख्या वाढत आहे. १८८० पर्यंत २२० ग्रह सांपडले होते. १८९० अखेर ती संख्या ३०० झाली. व १८९२ जुलईपर्यंत ३२७ झाली आहे. ह्यांतील फ्लोरा आणि हिजिया ह्या दोन ग्रहांचें सूर्यापासून अंतर चित्रांक २ ह्यांत दाखविले आहे. (पृष्ठ ११). एक मोठा ग्रह फुटून त्याचे हे लहान ग्रह झाले असतील हे आलबर्सचे मत हल्ली ग्राह्य नाही. कदाचित् तसे झालेच असेल तर त्या गोष्टीस आजपर्यंत को. ट्यवधि वर्षे झाली असली पाहिजेत. तेजोमेघकल्पनेप्रमाणे ह्या लघुग्रहांची उत्पत्ति निराळ्या प्रकारची आहे असें हल्ली ठरले आहे. त्याबद्दल वर्णन पुढे येईल. हे सर्व ग्रह फार लहान आहेत; यामुळे ह्यांचा आकार ठरविणे फार कठिण पडते. त्यांच्या प्रकाशावरून त्यांच्या आकाराचे अनुमान करितात. सिरिस आणि वेस्ता हे त्या सर्वात मोठे आहेत. त्यांचा व्यास २०० पासून ४०० मैलांपर्यंत आहे. परंतु काहींचे व्यास तर २० पासून ४० मैलपर्यंत आहेत. या ग्रहांची संख्या आणि प्रत्येकाचा आकार ह्यांची काही तरी मर्यादा असावी, आणि हल्ली सांपडले आहेत यांहून फार लहान असे दुसरे ग्रह नसावे असे अनुमान आहे. परंतु हल्लीच्याहून फार मोठ्या दुर्बिणी पुढे निघून त्यांतून हल्लीच्यांहून फार बारीक असे ग्रह सांपडणार नाहीत असा नियम नाही. आणि तसे झाल्यास ह्यांची संख्याही अमर्याद असू शकेल. तथापि ह्या सर्व ग्रहांचे मिळून जे एकंदर द्रव्य ते मर्यादित आहे. ग्रहाच्या द्रव्याप्रमाणे त्याचे इतर ग्रहांवर आकर्षण पडते व त्यामुळे त्या मानाने त्याच्या गतीत अनियमितपणा येतो. सगळ्या लघुग्रहांचे मिळून द्रव्य मोठ्या ग्रहांपैकी एकाच्या इतके असते तर त्यामुळे मंगळ आणि गुरु ह्यांच्या कक्षांत कांहीं फरक दिसला असता. परंतु गेल्या शंभर वर्षात झालेल्या वेधांवरून असा फरक काही दिसला नाही. यावरून त्यांचे द्रव्य फार नाही असे सिद्ध होतें. हल्ली सांपडलेले सर्व ग्रह मिळून एक ग्रह बनविला तर त्याचा व्यास सुमारे ४०० मैल होईल. व त्यांत सन १८५० पासून जे ग्रह सांपडले आहेत तेवढाले आणखी हजार ग्रह भरीस घातले तरी त्याचा व्यास ५०० मैलांहून जास्त होणार नाही. म्हणजे त्याचे द्रव्य बुधाच्या सुमारे १. किंवा पृथ्वीच्या .. होईल.. ह्या लघुग्रहांची कक्षाकेंद्रच्युति आणि विक्षेपमाने फार आहेत. बुध खेरीज करून कोणत्याही ग्रहाची च्युति व्यासाच्या दशांशा इतकी नाही. व विक्षेपमान दोन तीन अंशांहून जास्त नाही. परंतु पुष्कळ लघुग्रहांची च्युति व्यासाच्या अष्टमांश आहे. व विक्षेपमान १० अंशांहून जास्त आहे. यामुळे त्यांची सूर्यापासून अंतरें फार कमजास्त होतात. ह्यांच्या कक्षाप्रदेशाची मंगळाकडची बाजू मंगळापासून तीन-चार कोटी मैलांवर व सूर्यापासून १८ कोटी मैलांवर आहे. व गु.