पान:ज्योतिर्विलास.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३६ ज्योतिर्विलास. मंगळावरील जमीन, पाणी, त्यांचे विभाग, तेथील हवा, मेघ, पर्जन्य इत्यादि गोष्टी वरून मंगळावर पृथ्वीवरील प्राण्यांप्रमाणे प्राणी नसले तरी कोणत्या तरी प्रकारचे प्राणी असावे असे दृढ अनुमान होते. आणि त्याबरोबरच मंगळावरील वातावरणादि गोष्टी आपल्यास हितकारक नाहीत, तरी आपली वातावरणादि परिस्थिति आपल्यास मंगळदायक आहे इतकेंच नाही, तर पृथ्वीवरील निरनिराळ्या प्राण्यांस त्यांची त्यांची परिस्थिति मंगलदायक आहे, हे मनांत येऊन ती स्थिति देणाच्या मंगलमूर्तीकडे लक्ष लागते. JAILND खेड, ( .