पान:ज्योतिर्विलास.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. बुध. हतात किंवा सास दुसऱ्या घरी का ही दुरून परस्पपृथ्वी हे आपले होय. बुधालही. सूर्याभोवती जे ग्रह फिरतात त्यांत बुध हा सूर्याच्या अगदी जवळ आहे. त्याच्या पलीकडे शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनि, युरेनस आणि नेप्चुन् हे ग्रह आहेत. मंगळ आणि गुरु ह्यांच्या मध्ये फार लहान लहान असे पुष्कळ ग्रह आहेत. युरेनस आणि नेप्चुन् नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत, बाकीचे दिसतात. सूर्य आणि त्याच्या भोवतालचे ग्रह उपग्रह यांमिळून विश्वाचा एक भाग होतो. ही सूर्याच्या कुटुंबांतली मंडळी परस्परांस जितकी जवळ आहे तितके जवळ आकाशांतल्या दुसऱ्या कुटुंबांतले दुसरे ह्यांस कोणी नाही. पृथ्वीवर जसे निरनिराळे गांव पसरलेले असतात तसा आपली सूर्यमाला हा विश्वांतला एक गांव होय. आपण ह्या गांवांत राहतो. आकाशांतील अनंत तारा ही दुसरी गांवें होत. त्यांत काही खेडी आहेत, कांही शहरे आहेत.. आपला गांव कांहीं फारसा मोठा नाही. खेडेंच म्हटले तरी चालेल. सूर्य हा ह्या गांवांतला मोठा वाडा होय. बुधादि ७ ग्रह ही लहानमोठी मध्यम प्रतीची घरे होत. पृथ्वी हे आपले घर आहे. ह्या घरांचा असा चमत्कार आहे की ही दुरून परस्परांवर दिसतात मात्र. एका घरच्या रहिवाशांस दुसऱ्या घरी जातां येत नाही. किंबहुना दुसऱ्या घरांत कोणी राहतात किंवा ती ओसाड आहेत हेही दिसत नाही. ह्या मध्यम गृहांभोवती लहान लहान ३१८ झोपडी आहेत. इतर गांवांतली लहान घरे आपल्यास दिसत नाहीत. मुख्य वाडा मात्र दिसतो. म्हणून त्यासच आपण गांव म्हणूं. आकाशांत बुधादि पांच ग्रह इतर तारांसारखेच दिसतात. हे ओळखावे कसे हे पाहूं.. तारांस चमक असते तशी ग्रहांस नसते. त्यांकडे पहात राहिले तर त्यांचें तेज स्थिर असल्यासारखे दिसते. परंतु एवढ्यावरून ते खात्रीने ओळखितां येणार नाहीत. मागें जी २७ नक्षत्रं सांगितली त्यांतूनच हे फिरतात. त्यांच्याहून उत्तरेस किंवा दक्षिणेस जात नाहीत. आणि ते पहिल्या प्रतीच्या तारांएवढे किंवा त्यांहून मोठे दिसतात. यामुळे नक्षत्रांची चांगली ओळख झाली असली तर त्यांहून निराळी मोठी एकादी तारा त्यांत दिसली की तो ग्रह आहे असे समजावें. ग्रह ओळखण्याचा तिसरा व खात्रीचा मार्ग हा की नक्षत्रांत एकादी नवी तारा दिसली आणि तो ग्रह आहे असे वाटले म्हणजे त्याच्या जवळच्या एक दोन तारांचे व त्यांचें अंतर दोन चार दिवस पहावे. अंतर बदललें म्हणजे तो ग्रह असे समजावे. गुरु, शनि ह्यांचे अंतर कदाचित् बदलणार नाही. परंतु गुरु इतका तेजस्वी दिसतो की तो ग्रह असे सहज ओळखते. शनि मात्र पहिल्या प्रतीच्या तारेहून फारसा मोठा दिसत नाही. म्हणून त्याजकडे आठ दहा दिवस पहावें. तितक्यांत त्याचे अंतर बदललेले दिसेल. एकादी मोठी तारा स्थिर आहे की चल आहे म्हणजे तो ग्रह आहे की का