पान:ज्योतिर्विलास.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बुध. य ह्याचा निर्णय झाला तरी ग्रह असल्यास कोणता ग्रह हे समजणे वरच्यासारखें सुलभ नाही. शुक्राइतका तेजस्वी दुसरा ग्रह नाही. परंतु सूर्याच्या जवळ असतां त्याचे तेज कमी होते. फार जवळ असला तर तो. अगदी बारीक दिसतो. सूर्याजवळ येतात तेव्हां सर्व ग्रह असेच बारीक दिसू लागतात. त्यामुळे तेव्हां हा अमुक ग्रह असे इतर साधनांशिवाय ओळखणे कठिण पडते. अमुक ग्रह कोण हे, ओळखण्याची सामान्य रीति म्हटली म्हणजे पंचांगांत पंध्रवड्याचे ग्रह दिलेले असतात त्यावरून तो कोणत्या राशीस आहे हे पाहणे ही होय. राशींची नक्षत्रे कोणती हे पंचांग प्रकरणांत सांगितलेच आहे. राशींची नक्षत्रे दोन तीन असतात. आणि आपल्या पंचांगांत ग्रह रोजचे दिलेले नसतात, पंध्रवड्याचे असतात. यामुळे त्यावरून स्थूलमानाने नक्षत्र समजेल. त्याच्या आसपास एक दोन नक्षत्रांत ग्रह सांपडेल. सायनपंचांगावरून पाहणे तर सायन राशीवरून निघणारे नक्षत आणि तारात्मक नक्षत्र यांत भेद आहे. परंतु सायन पंचांगांत ग्रहांची कोणत्या नक्षत्राच्या मुख्य तारेशी कधी युति होते हे शास्त्रार्थाच्या कोष्टकांत लिहिलेले असते. बुध, शुक्र, हे एका नक्षत्रांतून दुसऱ्यांत फार जलद जातात. मंगळही बराच जलद जातो. म्हणून जेव्हा आपल्यास पाहणे असेल त्या किंवा मागच्यापुढच्या पंध्रवड्यांत ह्या ३ ग्रहांची कोणत्या तारेशी युति कधी झाली आहे हे पहावे. त्यावरून आकाशांत पहाण्यास निरयन पंचांगांपेक्षाही सोईचे होईल. गुरु व शनि यांची युति एक दोन पंध्रवड्यांत लिहिलेली सांपडली तर बरेच. नाही तर ते ज्या राशीस लि. हिले असतील त्याच्या किंवा त्याच्या मागच्या राशीच्या नक्षत्रांत पहावे. याशिवाय प्रत्येक ग्रह ओळखण्याची रीति त्या त्या ग्रहाच्या प्रकरणांत लिहिली आहे. कधी कधी ग्रह सूर्याच्या फार जवळ असल्यामुळे मुळीच दिसत नाहीत. म्हणजे त्यांचा अस्त असतो. यासंबंधे विवेचन पुढील प्रकरणांत केले आहे. बुध आणि शक हे आपण आणि सूर्य यांच्या मध्ये आहेत. म्हणून ह्यांस अंतर्वर्ती ग्रह म्हणतात. इतरांस बहिर्वर्ती म्हणतात. बुध आणि शक्र हे आपणांस नेहमी सूर्याच्या जवळ दिसतात. सर्यापासून बुध फार तर १८ पासून २७ पर्यंत अंश दूर गेलेला दिसतो. ह्या दर जापास इनापगम म्हणतात. शुक्राचा परम इनापगम ४५ पासन ४७ अंशापर्यत आहे. हे दोन ग्रह रात्री कधीही मध्यान्ही दिसावयाचे नाहीत. कधी सायंकाळी पश्चिमेस दिसतात, कधी पहाटेस पूर्वेस दिसतात. परम इनापगमाच्या वेळी बुधशुक्र वस्तुतः सूर्यापासून किंवा आपल्यापासून परम अंतरावर असतात असे नाही. ते आपापल्या कक्षेत उच्ची असतात तेव्हां सूर्यापासून फार दूर असतात. आपल्यापासून अति दूर केव्हां असतात हे पुढे सांगू.. सारांश, परम इनापगम हा केवळ दृश्य मात्र होय; वास्तव नव्हे. बुध कधी दिसत नाही अशी आपल्यापैकी काही ज्योतिष्यांची समजत असते; परंतु ती चुकीची आहे. आपल्या देशांत बुध पहाण्याची उत्कृष्ट संधि पा