पान:ज्योतिर्विलास.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रहणे. त्यावर छाया पडलेली असते व त्या वेळी सूर्याचे किरण प्रत्यक्ष त्यावर पडत नाहीत; तरी ते पृथ्वीच्या वातावरणांतून वक्रीभवन पावून त्यावर पडतात. यामुळे तो अगदी काळा दिसत नाही; किंचित् प्रकाशित दिसतो. क्षितिजांत प्रकाशाचें वक्रीभवन फार होते, यामुळे चंद्रसूर्यांची वरची कड क्षितिजाखाली २।३ कला आहे तोच त्यांची सगळी बिबें क्षितिजावर दिसतात. चंद्रास ग्रहण लागले असते तेव्हां तो, सूर्य, आणि पृथ्वी, ही एका रेषेत असतात. यामुळे ग्रस्तचंद्र क्षितिजावर दिसत आहे तोपर्यंत सूर्य वस्तुतः दिसू नये. परंतु ग्रहण लागलेलाच चंद्र मावळला किंवा उगवला तर त्या वेळी वक्रीभवनामुळे दोघांचीही बिबें काही कला वर दिसतात. यामुळे दोघेही एक दोन मिनिटें क्षितिजावर दिसतात. सन १८९२ च्या मे महिन्यांत ग्रस्तास्त चंद्रग्रहण झाले, तेव्हां असें दिसण्याची संघि होती व त्याप्रमाणे मी ते पाहिले. उपोद्घातांत त्याविषयीं वर्णन आलेच आहे. CENERAL सार्वजारोह