पान:ज्योतिर्विलास.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०९ ग्रहणे. ता आणि भूछाया यांचे पूर्वपश्चिम अंतर शून्य होते तेव्हांच दक्षिणोत्तर अंतर शून्य झाले तर त्यास ग्रहण लागते. परंतु दर पूर्णिमेस ते अंतर शून्य होत नाही. - सपाट जमिनीवर एक मोठी बांगडी व तिच्या आंत एक बरीच लहान बांगडी ठेवा. दोन्ही बांगड्या एका सपाटीवर आहेत. ह्या एका पातळीत आहेत असें म्हणतात. चंद्रकक्षा आणि क्रांतिवृत्त ही आकाशांत अशीच एका पातळीत असती तर दर पूर्णिमेस चंद्र व भूभा यांचे आणि दर अमावास्येस चंद्र व सूर्य यांचें दक्षिणोत्तर अंतर शून्य झाले असते. परंतु दोहोंच्या पातळ्यांत ६ अंशांचा कोन आहे. त्या पातळ्या दोन ठिकाणी परस्परांस छेदितात. त्या बिंदूंस राहुकेतु म्हणतात. राहुकेतूंत किंवा त्यांच्या जवळ चंद्र असतो तेव्हां चंद्राचा शर शून्य किंवा अगदी थोडा असतो. म्हणजे क्रांतिवृत्ताच्या जवळच चंद्र असतो. यामुळे तेव्हां सूर्यही तेथेच असला तर त्याच्या आड चंद्र येतो. किंवा भूछाया तेथें असली तर तीत चंद्र सांपडतो. यामुळे ग्रहणे होतात. राहुकेतूंपासून चंद्र लांब असला तर तो क्रांतिवृत्तापासून लांब असतो. यामुळे त्याचा शर सूर्यबिंब किंवा भूभाबिंब यांहून जास्त होतो. यामुळे तो सूर्याच्या आड येत नाही, किंवा भूछायेंत सांपडत नाही. यामुळे ग्रहण होत नाही. एकदां पूर्णिमेस किंवा अमावास्येस ग्रहण झाल्यापासून पुढे एक किंवा दोन पास ग्रहणे होतात. म्हणजे लगत दोन किंवा तीन होतात. कधी एकच होते. व त्यापुढे पांच, किंवा साडेपांच, किंवा सहा चांद्रमहिन्यांनी पुनः ग्रहण होते. चंद्रग्रहण नेहमी पूर्णिमेस आणि सूर्यग्रहण अमावास्येस होते. सूर्यग्रहण लागण्यापूर्वी सूर्याच्या पश्चिमेस चंद्र असतो. परंतु तो जलद चालणारा असल्यामुळे सूर्याचे बिंब ओलांडून काही वेळाने सूर्याच्या पूर्वेस येतो. पश्चिमेकडून चंद्र येतां येतां सूर्याच्या पश्चिमकडेच्या आड तो येतांच सूर्यास त्या दिशेने ग्रहण लागू लागते. तेव्हां ग्रहणाचा स्पर्श झाला असे म्हणतात. अर्थात् सूर्यग्रहणाचा स्पर्श सूर्यबिंबाच्या पश्चिमेकडून होतो, आणि पुढे सूर्यबिंबाचा अधिकाधिक भाग आच्छादित होऊ लागतो. नंतर काही वेळाने तो कमी व्हावयास लागून सूर्याच्या पूर्व बाजूने चंद्र सूर्यास मोकळा करितो; म्हणजे ग्रहण सुटते; त्या वेळी ग्रहणाचा मोक्ष झाला असे म्हणतात. मोक्ष ह्याचा अर्थ सु. टका असा आहे. ह्याप्रमाणेच भूछायेच्या पश्चिमेकडून चंद्र येऊन पूर्वेस जातो. यामुळे त्याचा पूर्वभाग प्रथम आच्छादित होतो. आणि पश्चिम भाग शेवटी छायेतून बाहेर पडतो. म्हणून चंद्रग्रहणाचा स्पर्श बिंबाच्या पूर्वेकडून आणि मोक्ष पश्चिमेकडून होतो. बिंबाचा जितका भाग आच्छादित होतो, तितका ग्रास झाला असे म्हणतात. स्पर्शापासून मोक्षापर्यंत जो काळ जातो त्यास पर्वकाळ म्हणतात. या कालाच्या मध्याच्या सुमारास महत्तम ग्रास होतो, तेव्हां ग्रहणाचा मध्य झाला असे म्हणतात. त्या वेळी जो भाग आच्छादित होतो, तो ग्रास पंचांगांत लिहितात,

  • भूभा म्हणजे पृथ्वीची छाया.