पान:ज्योतिर्विलास.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. आणि ग्रहणाची आकृति पंचांगांत काढितात तींत दाखवितात. ग्रास ह्याचा अर्थ खाणे असा आहे. राहु सूर्यास ग्रासितो अशी मळची कल्पना होती, तीवरून ग्रास ही संज्ञा प्रचारांत आली असावी. - चंद्रसर्यांची बिवें विस्ताराने बहुधा सारखीच दिसतात. तरी पृथ्वा आणि चंद्र यांच्या कक्षा दीर्घवर्तुळ असल्यामुळे चंद्रसया, पृथ्वीपासन अंतर नहमी समान नसते; कमजास्त होते. यामुळे बिबें लहानमोठी दिसतात. कक्षेतला जो बिंदु मध्यवर्ति ज्योतीपासून लांब असतो त्यास उच्च म्हणतात: आणि जवळ असतो त्यास नीच म्हणतात. सूर्य हल्ली दिसेंबर अखेर आपल्या कक्षेत नीची* असतो आणि जन अखेर उच्ची असतो. चंद्र समारें २७॥ दिवसांत एकदा आपल्या कक्षच्या नीची आणि एकदां उच्ची येतो. चंद्रसर्य उच्ची असतात तेव्हां त्यांची बिबे लहान दिसतात, आणि नीची असतात तेव्हां मोठी दिसतात. चंद्र नीची आणि सूर्य उच्ची असतां सूर्यबिंबाहून चंद्रबिंब बरेच मोठे दिसते. अशा वेळी ग्रहण झाले तर ते खग्रास होते. सूर्यबिंबाहून चंद्रबिंब लहान असते तेव्हां कंकणग्रहण होत. खग्रास होते तेव्हां चंद्राची छाया पृथ्वीवर पडते, तिचा व्यास फार तर १८० मैल असतो. यामुळे इतक्या रुंदीचा पृथ्वीचा जितका पूर्वपश्चिम पट्टा सूर्यबिंबावरून चंद्र पलीकडे जाईपर्यंत दैनंदिनगतीमुळे छायेत येतो, तेथे मात्र खग्रास ग्रहण होते. कंकणग्रहणांत ते कंकण दिसण्याचा पट्टा सुमारे १०० मैल रुंद असतो. ह्या प यांच्या उत्तरेस व दक्षिणेस तीच ग्रहणे खंडित मात्र दिसतात. यामुळे स्थलवि. शेषी खग्रास किंवा कंकण सूर्यग्रहण फार वर्षांनी दिसते. खग्रास सूर्यग्रहणांत सूर्य अगदी आच्छादिलेला असा फार तर ८ मिनिटे असतो. आणि कंकणग्रहण फार तर ३१ पळे दिसते. चंद्र जेथे असतो तेथें पृथ्वीछायेचा व्यास चंद्रबिंबाहून पुष्कक मोठा असतो. कधी कधी तो चंद्रबिंबाच्या तिप्पट असतो. म्हणजे ग्रहणाचे वेळी भूभा आणि चंद्र यांचे मध्यबिंदु एका ठिकाणी आले तर चंद्राभोवती चंद्रबिंबाच्या दीडपट रुंदीचे भभावेष्टन असते. यामुळे चंद्रास कंकणग्रहण कधीही लागावयाचे नाही. भूछायेतून जाण्यास चंद्रास फार वेळ लागतो. म्हणून खग्रास-चंद्रग्रहण फार वेळ दिसते. या वेळी भूभेने चंद्राचा ग्रास होऊन ख म्हणजे आकाश ह्याचाही होतो, म्हणून त्यास खग्रासग्रहण म्हणतात. भूभेच्या भोंवतीं छायाकल्प असतो. त्यांत चंद्र येतो तेव्हां अंमळ निस्तेज दिसतो. यामुळेच खग्रासचंद्रग्रहणांत स्पर्शापूर्वी व नंतर काही वेळ चंद्र फिकट दिसत असतो. चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर चंद्र जेथे जेथे दिसेल तेथे चंद्रग्रहण दिसते व ते सर्वत्र सारखें दिसते, कमजास्त दिसत नाही. " खग्रास चंद्रग्रहणांत चंद्राच्या व आपल्यामध्ये कोणी आलेले नसते. फक्त

  • वस्तुतः पृथ्वी आपल्या कक्षेत नीची येते. सूर्य पृथ्वीसभोवती फिरतो असें मानिले तरी प्रहणासंबंधे परिणाम एकच होतात. तसे म्हणून काही विषय समजण्यास सुलभ पडतात, म्हणून पृथ्वी फरते याबद्दल कोठे कोठे सूर्य फिरतो असेंच लिहिले आहे. पृथ्वीची कक्षा तीच सूर्याची कक्षा.