पान:ज्योतिर्विलास.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. तेथें सूर्य दिसतच असतो. दिवसास एकादे वेळी आपण असतो तेथें ऊन असते, आणि काही अंतरावर एकाद्या लहानशा ढगाची सावली पडलेली असते. व ती जलद पळत असते, असे पुष्कळ वेळां आपल्या दृष्टीस पडते. अशीच गोष्ट चंद्राची आहे. ढगांपेक्षां चंद्र फार मोठा आहे. त्याची छाया ढगांच्या छायेहून फार मोठी असते. यामुळे पृथ्वीच्या बऱ्याच भागावर ती पसरते. दिव्याच्या लहानशा ज्योतीसमोर एकादी मोठी दगडाची वाटोळी गोटी धरिली, आणि तिची छाया भिंतीवर पाडिली तर ती वाटोळीच परंतु गोटीहून मोठी पडेल. काही उपायाने ज्योत फार मोठी वाटोळी केली आणि तिच्या समोर एक लहानशी गोटी धरिली तर तिची छाया भिंतीवर तिच्याहून लहान पडेल. ती गोटी ज्योतीच्या आड परंतु भिंतीपासून पहिल्यापेक्षा लांब धरिली तर एकादे वेळी तिची छाया भिंतीवर पोचणारही नाही. ही गोव्यांची छाया शंकूच्या आकाराची पडते. तिला सूचि असेही म्हणतात. एक फार मोठी वाटोळी ज्योत करा. तिच्या समोरच तिच्याहून फार लहान असें एक लिंबूं धरा. ज्योत व लिंबू यांमध्ये लिंबाहून फार लहान अशी एक गोटी धरा. गोटी हा चंद्र, लिंबूं ही पृथ्वी, आणि ज्योत हा सूर्य, अशी कल्पना करा. ज्योत आणि लिंबू यांच्यामध्ये गोटी आणा. तिहींचे मध्यबिंदु एका सरळरेषेत येतील असें करा. गोटीची लहानशी छाया लिंबावर पडेल, इतकी लांब ती मोटी धरा. छायेंतील लोकांस ज्योत मुळीच दिसणार नाहीं; तिला खग्रास ग्रहण लागले. छायेच्या भोंवतीं पुसट छाया पडलेली दिसेल; तिला छायाकल्प म्हणतात. तीतील लोकांस सूर्याचा काही भाग दिसत नाही. त्यांस खंडग्रहण दिसते. छायाकल्पाबाहेर ज्योतीचा पूर्ण प्रकाश पडले. ला असेल. तेथे ग्रहण मुळीच नाही. गोटी प्रथम धरिली होती, तेथून अंमळ दिव्याकडे नेऊन तिची छाया लिंबावर मुळीच पोचणार नाही असे करा. ज्योत आणि गोटी ह्यांच्या मध्यबिंदूच्या समोरचा जो लिंबावरचा बिंदु तेथे एकादी मुंगी असली तर तिला कंकणाच्या आकाराची ज्योतीची वाटोळची कडा दिसून मधल्या भागाच्या आड गोटी आल्यामुळे तो दिसणार नाही. म्हणजे कंकणग्रहण : लागले. मग लिंबाच्या छायेंत गोटी आणा. ज्योत आणि गोटी ह्यांच्या थेट मध्ये लिंबू असले तर गोटी सगळी छायेत सांपडेल. तिला खग्रास ग्रहण लागले. गोटी पर किवा खाली केली, अशी की तिच्या थोड्याशा भागावर उजेड पडेल. तर तिला खंडग्रहण लागले. मावास्यच्या वेळी सूर्याच्या खाली चंद्र कोठे तरी असतो. आणि सर्य कातरा असतो. पृथ्वी क्रांतिवत्ताच्या मध्यबिंदत असते. अथोत टण्याचा छाया कतिवृत्तातच समोर असते. ती छाया आणि सूर्य ह्यांमध्ये नेहमी अध्या पारघाइतक म्हणजे ६ राशींचे अंतर असते. पर्णिमेच्या रात्री चंद्र जेथे असता, त्याच्या आसपास भूछाया क्रांतिवृत्तांत असते. सूर्याइतकीच भछायेची गति असते. तिच्याहून चंद्र जलद चालतो. तो पश्चिमेकडून पूर्वेस जातां जातां अर्ध्या परिघाइतके महत्तांतच समोर क्रांतिवृत्ताच्या मध्यावत