पान:ज्योतिर्विलास.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. ग्रहणे. सहस्ररश्मि प्रकाशलेला आहे, सर्व लोक आपल्या कामांत मग्न आहेत, पशुपक्ष्यादि प्राणी भक्ष्यादिकांच्या उद्योगांत आहेत, इतक्यांत अकस्मात् अंधकार पडला, रात होण्याची वेळ नसतां रात्र झाली, अथवा सगळ्या कलांनी प्रकाशलेल्या चंद्राचे आनंददायक चांदणे पडले असतां एकदम ते नाहीसे होऊन तो चंद्र काळाठिक्कर पडला; तर मनुष्यादि सर्व प्राण्यांस अति आश्चर्य वाटेल, फार भीति उत्पन्न होईल, आणि ते वेड्यासारखे होतील. कधी कधी असे होते, असे ज्यांस स्वानुभवाने किंवा परंपरागत गोष्टी ऐकून माहीत नसेल त्यांची अवस्था तर विलक्षणच होईल. पशुपक्ष्यादि प्राणी आणि रानटी लोक ह्यांस परंपरागत इतिहास कोठचा, आणि त्यांस स्वानुभवाचे स्मरण कोठचे राहणार ? खग्रास-सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण पाहून सर्वकाल त्यांची अवस्था अशीच होणार. कोलंबस अमेरिकेत गेला होता, तेव्हां तो एका बेटांत असतां तेथले लोक त्यास अन्नादि सामुग्रीचा पुरवठा करीत असत. परंतु पुढे काही कारणाने त्यांचे आणि कोलंबसाच्या लोकांचे वैमनस्य आल्यामुळे बेटांतले लोक पुरवठा करीतनासे झाले. अशा संधीस खग्रास चंद्रग्रहण आले. ते कोलंबसास समजले होते. त्याने त्या लोकांस सांगितले की, तुम्हांवर देवाचा कोप झाला आहे, त्याचे चिन्ह आज रात्री तुम्हांस दिसेल. एकाएकी अंधार पडेल; चंद्र प्रथम काळा दिसेल; आणि मग लाल दिसूं लागेल. त्याप्रमाणे रात्री झाले. तेव्हां त्या लोकांस अतिशयित भीति वाटून त्यांनी कोलंबसास तत्काल धान्यादिक आणून दिले. विद्याचारसंपन्न देशांत देखील आद्यस्थितीत खग्रासग्रहणांनी मनुष्यांची अशीच स्थिति कांहीं काल झाली असेल. खग्रास सूर्यग्रहणे पु. प्कळ होतात, तरी एकाच स्थली ती फार थोडी दिसतात. लंदनामध्ये इ. स. ११४० या वर्षी खग्रास सूर्यग्रहण पडले. त्यावर पुनः इ० स० १७१५ मध्ये झाले. म्हणजे मध्ये पावणेसहाशे वर्षांत मुळीच झाले नाही. असें आहे यामुळे ग्रहणाविषयी ऐकून माहिती असली तरी ते प्रत्यक्ष पाहून मनुष्य आश्चर्यभरित आणि चकित झाल्यावांचन राहणार नाही. प्राचीनकाली एकदां आशियामायनरांतील मीडिया आणि लीडिया या प्रांतांतील लोकांचे युद्ध चालले होते. त्यासंबंधे वर्णन हिराडोटसने केले आहे, त्यांत तो म्हणातो की; पांच वर्षे युद्ध चाललें. कधी या पक्षाचा जय होई, कधी त्या पक्षाचा होई. सहावे वर्षी एकदां दोन्ही सैन्ये युद्धाच्या कडाक्यांत गुंतली असतां अकस्मात् दिवसाची रात्र झाली. तेव्हां उभयपक्षांस भीति पडून त्यांचा तह झाला. हे ग्रहण कधी झाले याविषयी ज्योतिष्यांचा बरेच दिवस मतभेद होता. हल्ली इंग्लंदच्या एरी नामक प्रख्यात ज्योतिष्याने गणित करून ठरविले आहे की, ते इसवी सनापूर्वी ५८४ या वर्षी मेच्या २८ व्या तारखेस झाले. हिराडोटसच्या लिहिण्यावरून हेच वर्ष निघते. ग्रीस इत्यादि देशांच्या प्राचीन इतिहासांत अशी ग्रहणांची वर्णने आणखी बरीच आहेत. त्यांतील बहुतेकांचा संबंध लढायांशी आहे.