पान:ज्योतिर्विलास.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रहणे. "अकस्मात् सूर्य दिसेनासा झाला, यामुळे कोणी लोक शहर सोडून गेले. " "सैन्य कूच करणार इतक्यांत अभै नसतां सूर्य दिसेनासा झाला, आणि दिवसाची एकाएकी रात्र झाली. यामुळे सैन्याचे जाणे राहिले." "आरमार युद्धाच्या अगदी तयारीत आहे इतक्यांत अकस्मात् काळोख पडला. खलाशांस भीति पडली. मुख्य -सुकाणवाला गोंधळून गेला." "सैन्य समुद्रांतून जात असतां इतका अंधार पडला की, दिवसास नक्षत्रं दिसं लागली. सैन्य घाबरून गेले." "सूर्यमंडल झांकून गले. त्याच्या बिंबाभोंवती कोणी किरीट घातला आहे असे दिसले. व तेणेकरून राजा मरण पावणार असें भविष्य दिसून आले." अशी वर्णने त्या इतिहासांत आढळतात. इ. सन ११४० मध्ये इंग्लंदांत खग्रास-सूर्यग्रहण झाले. त्याचे असें वर्णन आहे की, "दोन प्रहरचा समार होता; लोक जेवणांत गुंतले होते; इतक्यांत अं. धार पडला. सूर्य काळा दिसं लागला. खाण्यास दिसेना, यामुळे कंदील लावावे लागल. लोक आश्चर्याने चकित झाले. व अंधकार इतका पडला की आजच प्रलय होतो की काय असे त्यांस वाटले. आकाशांत तारा दिसं लागल्या. " याप्रमाण वणन करून पढे त्या ग्रहणामळे अमक अमक भयंकर गोष्टी घडल्या असे त्या लिहिणाराने लिहिले आहे. ऋग्वेदांतले सौरसक्त नांवाचे सर्याचे स्तोत्र म्हणत असतात. त्यांत असें वजाल आह:-“हे सर्या आसर स्वर्भानने तुला तमाने आच्छादिले, तेव्हां कोणास आपले स्थानही दिसेना. सगळे लोक अगदी भांबावल्यासारखे झाले. हे इंद्रात स्वभोनूच्या मायांचा नाश करितोस. तमानें झांकलेल्या सूर्यास अत्रीने ब्रह्मज्ञानाने मुक्त केले. अलीने स्वर्भानच्या मायांचे निवारण केले. अत्रि सूर्याला मिळविते झाले, इतर कोणी मिळवू शकले नाहीत. " महाभारतादिकांत ग्रहणांचे वर्णन पुष्कळ ठिकाणी आहे. त्यांत बहुधा काही विपरीत किंवा फारशी कधी न घडणारी गोष्ट घडण्याच्या वेळी ग्रहण पडले हात, अथवा ग्रहण झाल्यावर विपरीत गोष्टी झाल्या, असे वर्णन असते. या देशातील बहुतेक क्षत्रियांचा संहार करणारे कौरवपांडवांचे महाभयंकर युद्ध झाले. त्याच्या पूर्वी नुकतीच एकाच महिन्यांत चंद्राचे व सूर्याचे अशी दोन ग्रहणे झाली हाता, आणि त्यांवरून त्या प्रळयाचे चिन्ह दिसून आले होते असे वर्णन आहे. गेल्या सोळाशे वर्षातले अनेक राजांचे शेकडो ताम्रपट हल्ली सांपडले आहेत. आणि त्यांवरून या देशाच्या प्राचीन इतिहासाचा पुष्कळ चांगला विश्वसनीय शोध लागत चालला आहे. बहतेक ताम्रपट एकाद्या पुण्यकारक पर्वाच्या वेळी ब्राह्मणांस भमि इत्यादिकांचे दान केल्याच्या संबंधाचे आहेत. त्यांत सूर्यग्रहण अथवा चंद्रग्रहण यांच्या वेळी भूमिदान केल्याचा लेख पुष्कळ ताम्रपटांत आहे. ग्रहणाच्या वेळी भूमिदान केले असतां फार पुण्य लागते, " चंद्रसूर्यग्रहणांचे वेळी दिलेले अक्षय्य होतें" असें धर्मशास्त्रादिकांत सांगितले आहे. १-ऋ.५, ४, २-हें भाषांतर भक्षरशः नाही, तरी यांत पदरचे काही नाही. ३-भारत वनपर्व,२००.२५.