पान:ज्योतिर्विलास.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पंचाग यांच्या रेखांशांचे अंतर सुमारे २ अंश आहे. आणि बार्शी पुण्याच्या पूर्वेस आहे. तर बार्शी येथे एकादशी ४० घटका ३० पळे समजावी. पुण्याच्या पश्चिमेस मुंबई एक अंश आहे. तर मुंबई येथे एकादशी ४० घटकाचे आली. हा नियम तिथि, नक्षत्र, योग, करण, चंद्रसूर्यादिकांची राश्यंतरें व नक्षत्रांतरे, चंद्रग्रहण, यांच्या वेळांस लागू आहे. चंद्रग्रहण पुण्यास निजकालाच्या ३ वाजतां सुटले तर बाशीस निजकालाचे ३ वाजून ८ मिनिटांनी सुटेल. सूर्यग्रहणास ही गोष्ट लागू नाही. हल्लीच्या या प्रांतांतील सर्व पंचांगांत तिथ्यादिकांची घटीपळे मध्यम-सूर्योदयापासून असतात. ती वस्तुतः स्पष्टोदयापासून पाहिजेत. तशी करणे तर आणखी २ संस्कार करावे लागतात. ते सायन पंचांगांत सांगितले आहेत. येथे सांगणे तर फार विस्तार होईल. आमच्या पंचांगांतील बहुतेक अंगांचा संबंध आकाशांतील कोणत्या ना कोणत्या तरी स्थितीशी आहे. युरोपियन पंचांगांतील बहुतेक अंगें कृत्रिम आहेत. त्यांचे वर्षांचे दिवस ३६५ किंवा ३६६; महिन्याचे दिवस २८, २९, ३०, ३१ ही माने आकाशांतली कोणतीही स्थिति दाखवीत नाहीत. आमचें पंचांग नैसर्गिक आहे. __पंचांगांत आरंभी संवत्सरफले दिलेली असतात. त्यांत त्या संवत्सरांत राजा काण, मंत्री कोण, वगैरे सांगून त्यांची फळे सांगितली असतात. चैत्र शुक्ल प्रतिपदेस जो वार असेल तो राजा सूर्याचें मेष संक्रमण ज्या वारी होईल तो मंत्री; आद्रोप्रवेश ज्या वारी होईल तो मेघेश; कर्क, सिंह आणि धनु, ही संक्रमणे ज्या वारी होतील ते क्रमाने पूर्वधान्ये, सेना, पश्चिमधान्ये, यांचे अधिप; असा नियम आहे. अमक्याचा स्वामी अमुक असतां अमुक फल होते असे ठरलेले आहे. त्यांत चंद्र, बुध, गुरु, शुक्र, हे शुभग्रह मानिले आहेत. यांची फलें चांगली असतात. इतरांची बहुधा वाईट असतात. कांहीं पंचांगांत अधिप यांपेक्षां बरेच जास्त असतात. विंशोपकांत आपलेकडे फार गोष्टी असतात. इतक्या इतर बहुतेक प्रांतांतल्या पंचांगांत नसतात. ___पंचांगांत दुसऱ्या किरकोळ गोष्टी बऱ्याच असतात. परंतु विस्तरभयास्तव त्या येथे सांगत नाही.

  • हल्ली मुंबई पुण्यांची पंचांगें नांवाला मात्र भिन्न असतात. म्हणून त्यांत हे १० पळाचे मं.

तर भसत नाही. KENERAL UBIN RARAYANE GEN सार्वजनिक वाचनाला खेड, (पुणे.)