पान:ज्योतिर्विलास.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ ज्योतिर्विलास. पि गणिताने त्याचे मान काढितां येते. आणि त्याबरोबर चालणारे घड्याळ प्रत्यक्ष करितां येते. यामुळे मोठी सोय झाली आहे. मध्यमरवीचा उदय सकाळी ६ वाजतां होतो, असे मानितात; अर्थात् मध्यान्ह १२ वाजतां, आणि अस्त सायंकाळी ६ वाजतां होतो. परिशिष्ट १ यांत शेवटी मध्यमरवीचे विषवांश पूर्णतास कधी होतात तें दिलें आहे. एका दिवसांत ते सुमारे ४ मिनिटे वाढतात. व यावरून ते कोणत्याही दिवशीचे काढितां येतील. तसेच त्याच परिशिष्टांत नक्षत्रांचे विषुवाश दिले आहत. या दोहोंच्या साह्याने कोणत्याही रात्री एकादी तारा मध्यान्हीं पाहून घड्याळ लावितां येईल. उदाहरण, तारीख १ जानुआरी सन १८९३ च्या रात्री घड्याळ लावायाचे आहे. तारीख ५ जानुआरी रोजी मध्यमरवीचे विषुवांश १९ तास आहेत. तेव्हां पहिल्या तारखेस १८ तास ४६ मिनिटें आहेत. यांहून सुमारे एक तास कमी किंवा जास्त ज्यांचे विषुवांश आहेत त्या तारा त्या रात्री मुळीच दिसणार नाहींत. १८१४६ हून सुमारे ६ तास जास्त म्हणजे ० तास ४६ मिनिटें इतके ज्या तारेचे विषुवांश आहेत, ती तारा सूर्यास्ताच्या वेळी सूर्याच्या पुढे ६ तास असेल; म्हणजे मध्यान्हीं असेल. आणि त्यांहून जास्त १२ तास म्हणजे १२ तास ४६ मिनिटेंपर्यंत विषुवांशांच्या तारा रात्रीत केव्हां तरी मध्यान्हीं येतील. अश्विनीची दुसरी तारा मध्यान्हीं आलेली दिसली; तिचे विषुवांश ११४८ आहेत. ह्यांतून १८।४६ वजा केले. तेव्हां बाकी ७ तास २ मिनिटें राहिली. इतकी ती तारा मध्यमरवीच्या पुढे आहे, असे झाले. मध्यमरवि १२ वाजतां मध्यान्ही येतो. म्हणूत ती ७ वाजून २ मिनिटांनी मध्यान्हीं येईल. इतके घड्याळांत करावे. सारांश मध्यान्हीं असलेल्या तारेच्या विषुवांशांत त्या दिवशींचे मध्यमरवीचे विषुवांश वजा करावे; बाकी राहील तितके वाजले असे समजावे. मध्यान्हीं एकादी ठळक तारा नसेल तर अंमळ वाट पहावी लागेल. 'आतां, तारा मध्यान्हीं आली असे कसे समजावें ? ते समजण्यास दिशासाधन केलेले असेल तर चांगले. दिशासाधनाच्या रीति पुष्कळ आहेत. त्यांत यंत्रादि सामुग्रीवांचून बहुधा पाहिजे तेथे दिशासाधन करण्याच्या दोन रीति येथे सांगतो:समान भूमीवर एक शंकु ( काठी किंवा खिळा ) लंब होईल असा पुरावा. तो मध्य कल्पून पाहिजे तेवढ्या त्रिज्येने एक वर्तुळ काढावें. तें जितके मोठे असेल तितके चांगले. शंकूची अग्रछाया वर्तुळास दिवसांत केव्हां तरी स्पर्श करील, इतका तो उंच असावा. शंकूच्या टोकाची छाया वर्तुळाच्या परिघास मध्यान्हापूर्वी जेव्हां स्पर्श करील तेव्हां त्या स्पर्शबिंदुस्थानी खूण करावी. तसेच मध्यान्हानंतर ती अग्रछाया दुसऱ्या बाजूस परिघास जेथे स्पर्श करील त्या बिंदुस्थानी खूण करावी. हे दोन बिंदु सांधणारी रेषा पूर्वपश्चिम दिशा दाखविणारी होते. म्हणजे अर्थात् तिजवर लंब काढावा, तो उत्तरदक्षिण होतो. याप्रमाणे दिशासाधन एकदां केले म्हणजे ते नेहमी उपयोगी पडेल. हे दिशासाधन सायन मकर किंवा कर्क या राशीत सूर्य