पान:ज्योतिर्विलास.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पृथ्वीवरील सर्व घड्याळाचें घड्याळ. ८९ प्रवेश करितो त्या दिवशी, म्हणजे दिसेंबर व जून यांच्या २१ व्या तारखेच्या सुमारास, करावें. परिघास अग्रछायेचा स्पर्श दोन प्रहरांच्या अगोदर थोडाच वेळ होईल अशी योजना करावी म्हणजे दिशासाधन अगदी बिनचूक होईल; इतर दिवशी दिक्साधन केले तरी चालेल. परंतु ते जेव्हां करावयाचें तो दिवस सायन मकर व कर्क यांपासून जसा दूर असेल व परिघास अग्रछायेचा स्पर्श होण्याची वेळा मध्यान्हापासून जशी दूर असेल तसा स्थूलपणा राहण्याचा संभव आहे. परंतु तो फार आहे असे नाही. दिशा साधण्याची दुसरीही एक रीति आहे. ती अशी:दहा वीस हात लांब दोरी घेऊन तिचे एक टोंक उघड्या जागेत जमिनीपासून सुमारे पांच सहा हात उंचीवर कशास तरी बांधून स्थिर करावे. दुसरें एक टोंक धरून रात्रीस अशा ठिकाणी उभे रहावें की दोरीच्या रेषेने पाहिले असतां ध्रुव दिसेल. अशा रीतीने धरलेली दोरी हीच दक्षिणोत्तर रेषा होय. असो. याप्रमाणे उत्तरदक्षिणदिशादर्शक रेषा होईल त्याच अनुरोधाने आकाशांत याम्योत्तरवृत्त असावयाचें., एकदां साधारण दिशा समजल्या म्हणजे अजमासाने तारा मध्यान्हीं केव्हां आली हे समजेल. परिशिष्ट १ यांतले रविविषुवांश फार सूक्ष्मैं नाहीत, व तारा मध्यान्हीं केव्हां येते हैं साधारण अजमासाने पाहण्यांत कांहीं चूक होण्याचा संभव आहे. म्हणून ह्या रीतीने घड्याळ लाविले तर त्यांत कदाचित् पांच चार मिनिटे चुकी असेल. रोज सूर्य मध्यान्हीं केव्हां येतो हे सायनपंचांगांत व केरोपंती पंचांगांत दिलेले असते. त्यावरूनही घड्याळ लावितां येईल. ह्या वेळा पृथ्वीवर पाहिजे तेथे लागू आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. विषुववृत्तावर दिनमान सर्वदां ३० घटका असते असे आपण म्हणतो. परंतु ते सर्वांशी खरे नाही. सूर्य मध्यान्हीं येण्याच्या वेळा पृथ्वीवर लागू आहेत त्याप्रमाणे विषुववृत्तावरही लागू आहेत. त्या वेळा पाहिल्या तर त्यांवरून दिसते की, कधी सर्य ११ वाजून ५२ मिनिटांनी मध्यान्हीं आला तर दोन दिवसांनी ५३ मिकांनी येतो. म्हणजे १ मिनिट उशिरां येतो. असें वर्षांत बरेच वेळां होतें. अर्थात १२ तासांत सुमारे ३० सेकंद फरक पडला. म्हणजे अर्थात् दिनमान सेकंद, म्हणजे अयां पळाहून थोडे जास्त, इतके वाढले. विषुववृत्तावर दिनमान ३० घटकांहून कमजास्त होण्याचे मान फार तर १५ सेकंद आहे. म्हणून तेथे ३० घटका दिनमान असते असें सामान्यतः म्हणतात. तारा किंवा सूर्य यांचे उदयास्त पाहून त्यावरूनही घड्याळ अगदी बरोबर लावितां येते. क्षितिज बरोबर दिसले पाहिजे, एवढीच ह्या गोष्टीला अडचण आहे. उदयास्त काढण्यास चरसंस्कार म्हणून एक संस्कार द्यावा लागतो. त्याची रीति,

  • सायन पंचांगांत मध्यम स्वीचे विषुवांश रोजचे दिले असतात त्यांवरून ते सूक्ष्म समजतील.