पान:ज्योतिर्विलास.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८७ पृथ्वीवरील सर्व घड्याळांचे घड्याळ ६० घटका मानितात. युरोपियन लोक २४ तास मानितात. सूर्याच्या गतीचें मध्यम मान काढून तितकी म्हणजे सुमारे ५९ कला ८ विकला ज्याची दिवसांत गति आहे असा एक मध्यम रवि विषुववृत्तांत फिरतो असें मानितात. तो मध्यान्हीं आल्यापासून किंवा उगवल्यापासून पुन्हा मध्यान्हीं येण्यास किंवा उगवण्यास २४ तास लागतात. मध्यम रवीवरून जो काळ समजतो, त्यास मध्यमकाल म्हणतात. आणि प्रत्यक्ष सूर्यावरून जो काळ समजतो त्यास स्पष्टकाल म्हणतात. तारांची दैनंदिनगति अनियमित नाही म्हटले तरी चालेल. एकादी तारा एकदां उगवली, मध्यान्ही आली, किंवा मावळली असतां, तेव्हापासून ती पुन्हा उगवे, मध्यान्हीं येई, किंवा मावळेतोपर्यंत नेहमी एकसारखा वेळ लागतो. ह्या काळास नाक्षत्रदिवस म्हणतात. ह्या काळाचे २४ तास किंवा ६० घटका मानिल्या तरी चालतील; व तशा काही कामांत मानितातही. ह्याप्रमाणे नक्षत्रं जो काल दाखवितात तो नाक्षत्रकाल होय. मुंबईच्या वेधशाळेत नाक्षत्रकाल दाखविणारे एक घड्याळ आहे. वसंतसंपात मध्यान्हीं येईल तेव्हां त्यांत १२ वाजतात. हे घड्याळ पुष्कळांनी पाहिले असेल. . नक्षत्र उगवणे मावळणे ही गोष्ट पृथ्वीच्या दैनंदिनगतीमुळे होते. पृथ्वीला दैनंदिन प्रदक्षिणा करण्यास नेहमी समानकाळ लागतो. यामुळे नाक्षत्र दिवसाचे मान नेहमी समान असते; सावन दिवसासारखें कमजास्त नसते. म्हणून नक्षत्रं अथवा पृथ्वी हे सूर्यापेक्षाही सोईचे घड्याळ होय. नक्षत्रांवरून रात्रीचें मान सुमाराने सांगणारे लोक आपलेकडे बरेच आहेत. आपल्यास नक्षत्रांवरून सूक्ष्मकालही सांगतां येईल. . - नाक्षत्रदिवस नेहमी समान असतो खरा, तरी आपल्यास दिवस सूर्यावरून समजतो. सूर्य उगवला म्हणजे दिवस सुरू होतो. तेव्हां व्यवहारास नाक्षत्रादिवस उपयोगी नाहीं, सावन दिवसच घेतला पाहिजे. म्हणून नाक्षत्रकालावरून सावनकाल काढतां येण्याच्या तजविजी केल्या आहेत. -- सावन दिवस कमजास्त होतो. म्हणून घड्याळावरून समजून येणारा दिवस सावन दिवसाबरोबर नेहमी होईल असें करितां यावयाचे नाही. म्हणजे सूर्याची गति कमजास्त होते, तशी घड्याळाची कधी करितां येणार नाही. घड्याळ कधी मीच चालेल, कधी मंद चालेल. परंतु त्याची गति नियमित असणार. कांहीं एका परिमित वेळांत ते २४ तास ५ मिनिटे चालतें, तर नेहमी तितकेंच चालेल. किंवा २३ तास ५५ मिनिटे चालत असले, तर नेहमी तेवढेच चालेल. परंतु सर्य आज ६७ कला. काही दिवसांनी १८, आणि काही दिवसांनी १९, असा चालतो, त्याप्रमाणे घड्याळ कमजास्त चालणे ही गोष्ट असंभवनीय आहे; निदान आजच्या दृष्टीने तरी अशक्य आहे. घड्याळ सर्वदां सारखे चालणार. अर्थात् नेहमी समान गतीने चालणारा कल्पिलेला मध्यमरवि ज्याप्रमाणे मध्यमकाल दाखवितो, त्याप्रमाणे घड्याळही मध्यमकाल दाखविते. मध्यमरवि आकाशांत दिसत नाही. तथा

  • हा काल मध्यम सावनमानाने २३ तास ५६ मिनिटे ४.०९०६ सेकंद इतका आहे.

गात चालेल, कथा त २४ तास ५ असले, तर नेहमदिवसांनी ५९, तर नेहमीं तेवढंच त्याप्रमाणे मला काही दिवसांनी ६८