पान:ज्योतिर्विलास.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२८    ज्योतिर्विलास.
महिना नक्षत्र महिना नक्षत्र
चैत्र  चित्रा.  आश्विन   अश्विनी.
वैशाख विशाखा. कार्तिक कृत्तिका.
ज्येष्ठ. ज्येष्ठा. मार्गशीर्ष मृगशीर्ष.
आषाढ अषाढा. पौष पुष्य.
श्रावण श्रवण. माघ मघा.
भाद्रपद भाद्रपदा. फाल्गुन फल्गुनी.

 नक्षत्रे ओळखण्यास या यादीचा उपयोग होईलच. शिवाय यावरून स्थूलमानाने रात्रीचे मान समजेल. परिशिष्ट १ याच्या आधारें नक्षत्रांवरून बरेच सूक्ष्म रात्रिमान काढण्याची सोपी रीति पुढे एका प्रकरणांत सांगितली आहे.

 अश्विनीपासून १२ नक्षत्रांच्या सर्व तारा विषुववृत्ताच्या उत्तरेस आहेत. तसेंच स्वाती, अभिजित्, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा व रेवतीच्या कांहीं तारा ह्या उत्तरेस आहेत. बाकी सर्व दक्षिणेस आहेत.

 आकाशांत विषुववृत्त कसे समजावें तें पाहूं. आपल्यास अर्धे विषुववृत्त क्षितिजावर दिसते. ध्रुव जितका उंच तितकें तें खस्वस्तिकाच्या दक्षिणेस दिसते आणि तेथून ते पूर्वेकडे व पश्चिमेकडे तिरपे असते. त्याचे एक टोंक नेहमीं पूर्वबिंदूंत असते; आणि दुसरें पश्चिमबिंदूंत असते. सर्व तारा रोज फिरतातशा दिसतात, त्या विषुववृत्ताशी समांतर फिरतात.

 विषुववृत्त ध्यानात येण्याची आणखी एक खूण सांगतो. मृग नक्षत्र पुष्कळांस ठाऊक असेल. मार्गशीर्षांत हे आवशीस उगवते. पहिल्या किंवा तिसऱ्या नक्षत्रपटांत मृग आणि मृगशीर्ष पहा. मागच्या प्रकरणांत आपण व्याध पाहिलाच आहे, त्याच्या पश्चिमेस हे आहे. ह्यांत बऱ्याच तारा तेजस्वी आहेत. यामुळे हे चांगले शोभायमान् आणि रमणीय दिसते. त्यांत मध्यान्हीं येते तेव्हां तर ते विशेष आल्हादकारक दिसते. मार्चच्या आरंभी हे आवशीस मध्यान्हीं येते. मृग म्हणजे हरिण आणि व्याध म्हणजे पारधी. नकाशांत मृग नक्षत्र दाखविले आहे, त्यांत १,२, १२, १३ ह्या तारा मृगाचे चार पाय होत. त्यांच्या उत्तरेस ३ तारा आहेत, ते मृगाचे डोके होय. पायांपैकी पुढला डावा पाय आणि मागला उजवा पाय ह्या पहिल्या प्रतीच्या तारा आहेत. मृगाच्या पोटांत सरळरेषेत तीन तारा आहेत; हा व्याधाने मृगास मारलेला बाण आहे. व्याधाच्या समोरच ह्या तीन तारा आहेत. मृगाच्या पोटांतल्या बाणाच्या ह्या तीन तारा थेट पूर्वेस उगवतात, व पश्चिमेस मावळतात म्हटले तरी चालेल. उगवल्यापासून सुमारे ६ तासांनी त्या मध्यान्हीं येतात. तेव्हां त्या पाहण्यास आपल्यास दक्षिणेकडे तोंड फिरवावे लागते. पुढे सुमारे ६ तासांनी त्या मावळतात. ह्या तिहींपैकी अगदी उत्तरेची तारा सांप्रत विषुववृत्ताच्या अगदी जवळ दक्षिणेस आहे. परिशिष्टात तिची क्रांति दक्षिण २२ कला आहे. म्हणजे चंद्रबिंबव्यासाच्या सुमारे पाऊ-