पान:ज्योतिर्विलास.pdf/४५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


देवांची मंदिरें.    २९

णपट आहे. ती उगवल्यापासून मावळे पर्यंत ज्या मार्गाने जाईल त्याच्या उत्तरेस पाऊण चंद्रबिंबाइतक्या अंतरावरून विषुववृत्त जातें.

 खस्वस्तिकाच्या कोणत्या दिशेस कोणती नक्षत्रे दिसतील हे नकाशावरून समजेल. नक्षत्रे केव्हाही मध्यान्हीं येतील तेव्हां कोठे दिसतील हे पुढील नियमावरूनही समजेल. ज्या तारांची उत्तरक्रांति आपल्या जागेच्या अक्षांशां इतकी असेल त्या तारा आपल्या डोक्यावर दिसतील. त्यांहून जास्त उत्तरक्रांति असल्यास जितकी जास्त तितके अंश खस्वस्तिकाच्या उत्तरेस दिसतील. बाकीच्या दक्षिणस दिसतील. जागेच्या अक्षांशांहून कमी उत्तरक्रांति असेल तेव्हां अक्षांशांत क्रांतीचे अंश वजा करावे; बाकी उरेल तितके अंश तारा दक्षिणेस दिसेल. आणि क्रांति दक्षिण असल्यास ती अक्षांशांत मिळवावी. बेरजे इतके अंश तारा दक्षिणेस दिसेल. उदाहरण, पुण्याचे अक्षांश सुमारे १८॥ आहेत. तेथें वसिष्ठ मध्यान्हीं येईल तेव्हां तो खस्वस्तिकाच्या उत्तरेस ३७ अंश दिसेल. रोहिणीची तिसरा तारा सुमारें खस्वस्तिकी दिसेल. मृगशीर्षांतल्या तारा सुमारे (१८॥-९॥=) ९ अंश दक्षिणेस दिसतील. व्याध सुमारे (१८॥+ १६॥=)३५ अंश दक्षिणेस दिसेल.

 ऐतरेय ब्राह्मणांत मृग आणि व्याध यांची चमत्कारिक कथा आहे. व तीत च नांवांची कारणे आहेत. म्हणून ती येथे देतो:-" प्रजापतीने आपल्या कन्येचा अभिलाष केला. द्यू चा असें कोणी म्हणतात, उषेचा असे कोणी म्हणतात. ती हित् झाली. तिच्या जवळ तो ऋश्य होऊन गेला. त्याला देवांनी पाहिले. आणि प्रजापति अकृत करितो [ असे ते म्हणू लागले ]. त्याला मारील असा प्राणी ते पाहूं लागले. परंतु त्यांच्यांत असा कोणी सांपडला नाही. मग त्यांच्या त्या अति घोर तनु त्या त्यांनी एकत्र केल्या. त्यांचा एक देव झाला. त्याचे नांव भूतवत्. हे त्याचे नांव जो जाणतो तोच उत्पन्न झाला. त्याला देव म्हणाले, ह्या प्रजापतीने अकृत केले आहे. याला विद्ध कर. तो म्हणाला तसे [करतों]. तो म्हणाला मी तुमच्या जवळ वर मागतो. ते म्हणाले माग. तेव्हां पशुंचे आधिपत्य [ मला असावें ] असा वर त्याने मागितला. म्हणून त्याचे पशुमान हे नांव. जो त्याचे हे नांव जाणतो तो पशुमान् होतो. [तो] जाऊन त्याला वेधिता झाला. तो विद्ध झाला तो वर गेला. त्याला मृग म्हणतात. आणि मृगव्याध म्हणतात, तो [ज्याने विद्ध केलें] तोच. जी रोहित् [ झाली होती ती रोहीणी. जो ३ कांडांचा बाण होता तोच हा [ आकाशांतला ] त्रिकांड बाण".

 तैत्तिरीय ब्राह्मणांत रोहिणी आणि प्रजापति यांची कथा थोड्या निराळ्या प्रकाराने आहे. तिचा सारांश असाः-" प्रजापतीने प्रजा उत्पन्न केल्या. त्याच्या वीर्यापासून विराट झाली. तिचे देवासुरांनी ग्रहण केले. प्रजापति म्हणाला


 १--–तारादिकांच्या विषुवांशांत मध्यम रवीचे विषुवांश परिशिष्ट १ वरून काढून ते वजा करावें; बाकी इतके तास माध्यन्हापासून गेल्यावर तारादिक मध्यान्हीं येतील. शके १८१५ च्या सायन पंचांगांत मध्यमरवीचे विषुवांश रोजचे दिले आहेत. २-१३.९. ३-१.१.१०.