पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६३९] तत्त्वशान. ४५ जैसा नक्षत्राचिया आभासा- साठी घात जाला तया हंसा। माजी रत्नबुद्धीचिया आशा । रिगोनियां ॥...॥ अथवा निधान हे प्रगटले । म्हणोनि खदिरांगार खोळे भरिले। कां साउली नेणतां घातले । कुहां सिंह ॥ तेविं मी म्हणोनि प्रपंची । जिहीं बुडी दिधली कृतनिश्चयाची । तिहीं चंद्रासाठी जेविं जळींची। प्रभा धरिली॥ तैसा कृतनिश्चय वायां गेला । जैसा कोणी येक कांजी प्याला । मग परिणाम पाहो लागला । अमृताचा॥ तैसे स्थूळाकारी नाशिवंते । भरंवसा बांधोनि चित्ते । पाहती मज अविनाशात । तरि कैंचा दिसे ॥ ज्ञा. ९, १४०-१५२. ३९ ईश्वरास मानुषधर्म लावणे हे चुकीचे होय. येतुलेनि अनामा नाम । मज अक्रियासी कर्म । विदेहासी देहधर्म । आरोपिती ॥...॥ * मज वर्णहीना वर्ण । गुणातीतासि गुण । मज अचरणासी चरण । अपाणिया पाणी॥...॥ तैसे अश्रवणा श्रोत्र । मज अचक्षुसी नेत्र । अगोत्रा गोत्र । अरूपा रूप ॥...॥ मज अनावरणा प्रावरण । भूषणातीतासि भूषण । मज सकळकारणा कारण । देखती ते ॥ मज सहजाते करिती । स्वयंभाते प्रतिष्ठिती। निरंतराते आव्हानिती । विसर्जिती गा॥ मी सर्वदा स्वतःसिद्ध । तो की बाळ तरुण वृद्ध। मज एकरूपा संबंध । जाणती ऐसे ॥ ___१ ठेवा. २ खैराचे निखारे. ३ पदरांत. ४ उडी घातली. ५ ताकाची निवळ,, पेज, ६ नात्याचा संबंध. ७ आच्छादन घालण्यासारखा नसलेला.