पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ ज्ञानेश्वरवचनामृत [६३७ ३७. ईश्वर सर्वकर्ता अभून मनुष्य हा निमित्तमात्र आहे. येर चेष्टविते जे बळ । ते मागांचि मियां ग्रासिले सकळ । आतां कोल्हेरीचे वेताळे । तैसे निर्जीव हे आहाती ॥ हालविती दोरी तुटली । तरि तिये खांबावरील बाहुलीं। भलतेणे लोटलीं। उलथोनि पडती ॥ तैसा सैन्याचा यया बगा। मोडतां वेळ न लगे मैं गा। म्हणोनि उठीं उठी वेगां। शाहणा होई ॥ तुवां गोग्रहणाचेनि अवसरे। घातले मोहनास्त्र येकसरें। मग विराटाचेनि महाभेडे उत्तरे। आसनि नागविले ॥ आतां हे त्याहूनि निपटारे जाहाले । निवटी आयिते रण पडिले। घेई यश रिपु जिंतले । एकलेनि अर्जुने । _ ज्ञा. ११. ४६६-४७०. .. 2 ३८. ईश्वरास स्थूलदृष्टीने पाहणे हे पाहणे नव्हे. किंबहुना भैवा बिहाया । आणि साचे चाड आथि जरी मियां । तरि तूं गा उपपत्ति इया । जतन कीजे ॥ येहवीं दिठी वेधिली कवळे । ते चांदिणियाते म्हणे पिवळे । तेविं माझ्या स्वरूपी निर्मळे । देखिती दोष ॥ ना तरि ज्वरे विटाळले मुख । ते दुधाते म्हणे कडू विख । तोर्व अमानुषा मानुष । मानिती मातें ॥...॥ पैं स्थूलदृष्टी देखती माते । तेचि न देखणे जाण निरुते । जैसे स्वप्नींचेनि अमृते । अमर नोहिजे ॥...॥ १ मातीच्या चित्राचे. २ पुतळे. ३ आकार. ४ वेळी. ५ एकदम. ६ अतिभ्याडपणाचें. ७ हिसकावून. ८ हीन, निर्जीव. ९ संहार कर. १. संसाराला. ११ भीत असाल. १२ इच्छा. १३ युक्ती. १४ व्यापली. १५ कावीळ रागानें. १६ कडवट झालेले. १७ निश्चयेंकरून...