पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ ज्ञानेश्वरवचनामृत. [६३९ मज अद्वैतासी दुजें । मज अकर्तयासी कोजे । मी अभोक्ता की भुंजे । ऐसे म्हणती॥ मी स्वानंदाभिराम । तया मज अनेक सुखांचा काम। आघवाची मी असे सम । की म्हणती एकदेशी॥ मी आत्मा एक चराचरी । म्हणती एकाचा कैंपक्ष करी। आणि कोपोनि एकाते मारी । हेचि रूढविती ॥ किंबहुना ऐसे समस्त । जे हे मानुषधर्म प्राकृत। तयाचि नांव मी ऐसे विपरीत । ज्ञान तयांचे॥ जंव आकार एक पुढां देखती । तंव हा देव येणे भावे भजती। मग तोचि विघलिया टाकिती । नाही म्हणोनि ॥ माते येणे येणे प्रकारे । जाणती मनुष्य ऐसेनि आकारे । म्हणऊनि ज्ञानचि ते आंधारे । ज्ञानासि करी ॥ ज्ञा. ९. १५६-१७१. ४०. देवांची ईश्वराविषयी तळमळ. तैसें या जनासी जाहाले । तूते देखोनि तळमळित ठेलें। यामाजि पैलँ भले । सुरांचे मेळवि ॥ है तुझे आंगिक तेजें । जाळूनि सर्व कर्माची बीजे। मिळत तुज आंत निजे । सद्भावेसीं ॥ आणिक एक सावियाचि भयभीरू । सर्वस्वं धरूनि तुझी मोहरू। तुज प्रार्थिताती करू । जोडोनियां ॥ देवा अविद्यार्णवीं पडलो । जी विषयवागुरे आतुडलो। स्वर्गसंसाराचिया सांपडेलों । दोहीं भागी॥ ऐसे आमुचे सोडवणे । तुजवांचोनि कीजेल कवणे। तुज शरण गा सर्वप्राणे । म्हणत देवा ॥ १ कर्म. २ कैवार. ३ प्रसिद्धीस आणतात. ४ सामान्य. ५ भंगला. ६ काळोख. ७ पलीकडे. ८ समुदाय, ९ देवांचे समुदाय. १० सहजच. ११भयभीत.१२ मार्ग. १३विषयरूप जाळ्यांत. १४आडकलो. १५पेंचांत पडलो...