पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६३३ पाडस वागुर कैरांडी । कां मुंगी मेरू वोलांडी। तरि मायेची पैलथडी । देखती जीव ॥...॥ येथ एकाच लीला तरले । जे सर्वभावे मज भजले। तयां ऐलीच थडी सरले । मायाजळ ॥ ज्ञा. ७. ६८-९७ . ३४. ईश्वर नाही म्हणणारे लोक केवळ दैवहीन होत. म्हणोनि अर्जुना मी नसे । ऐसा कवण ठाव असे। परि प्राणियांचे दैव कैसे । जे न देखती माते ॥...॥ हे आंत बाहेर मियां कोदले। जग निखिल माझेचि वोतले। की कैसे कर्म तया आड आले । जे मीचि नाही म्हणती ॥ परि अमृतकुहाँ पडिजे। का आपणपयांत कडिये काढिजे । ऐसे अर्थी काय कीजे । अप्राप्तासी॥ प्रासा एका अन्नासाठीं । अंध धांवताहे किरिटी। आडळला चिंतामणी पाये लोटी। आंधळेपणे ॥ तैसें ज्ञान जै सांडूनि जाये। तें ऐसी हे दशा आहे। म्हणोनि कीजे ते केले नोहे । ज्ञानेंविण ॥ ज्ञा. ९. ३००-३०५. - ३५. विश्वांतील सर्व सत्ता ईश्वराकडे आहे. तो विश्वश्रियेचा भता । मीचि गा येथ पांडुसुता । मी गोसावी समस्ता । त्रैलोक्याचा॥ आकाशे सर्वत्र वसावे । वायूने नावभरी उगे नसावे । पावके दाहावे । वर्षावे जळे ॥ १ हरणाचे पोर. २ जाळें. ३ कुरतडी, तोडी. ४ परतीर. ५ सहज. ६ अलीकडच्याच. ७ तीरावर. ८ ठिकाण. ९ भरलें. १० कूपांत. ११ सांपडलेला. १२ विश्वांतील संपत्तीचे मरण पोषण करणारा. १३ धनी. १४ क्षणभर. १५ स्वस्थ.