पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-- - ६३३] तत्त्वज्ञान ३३. सर्वभावाने ईश्वराचे भजन करणारे लोकच . मायासागर तरून जातात. आतां महदादि हे माझी माया । उतरोनियां धनंजया। . मी होइजे हे आया । कैसनि ये ॥ जिये ब्रह्माचळाचा आधाडां । पहिल्या संकल्पजळाचा उभडा-1 सवेचि महाभूतांचा बुडबुडा । साना आला ॥...॥ जे गुणधेनाचेनि वृष्टिभरे । भरली मोहाचेनि महापुरे। घेऊन जात नगरें । यमनियमांची॥ द्वेषाच्या आवर्ती दाटत । मत्सराचे वळसे पडत । माजि प्रमादादि तळपत । महामीन ॥...॥ रतीचिया बेटा । आदळती कामाचिया लाटा । जेथ जीवफेनसंघाटा । संघ दिसे ॥...॥ तया पाणियाचेनि बहिलेपणे । अझुनि न धरिती वोभाणे। ऐसा मायापुर हा कवणे । नरिजेल गा॥ येथ एक नवलावो । जो जो कीजे तरणोपावो । तो तो अपावो । होय ते ऐक ॥ एक स्वयंबुद्धीच्या बाहीं । रिंगोले तयांची शुद्धीची नाहीं। एक जाणिवेचे डोहीं। गर्वैचि गिळिले ॥ एकी वेदत्रयाचिया सांगडीं। घेतल्या अहंभावाचिया धोडी । ते मदमीनांचिया तोडीं। सगळेचि गेले ॥...॥... एकी यजनक्रियेची पेटी। बांधोनि घातली पोटीं। ते स्वर्गसुखाच्या कपाटी। शिरकोनि ठेले ॥...॥ जेथ वैराग्याची नाव न रिगे। विवेकाचा तागी नलगे। वरि कांहीं तरों ये योगें । तरि विपाये तो ॥...॥ १ महत्तत्वादि. २ स्वाधीन, साध्य. ३ अर्धवट तुटलेला कडा. ४ उसळी. ५ गुणरूपी मेघांच्या. ६ भोवरें. ७ भरलेली. ८ वळणे. ९ चमकतात. १० समुदाय. ११ पुष्कळ. १२ वेगाने. १३ पूर. १४ हानि. १५ शिरले. १६ पत्ताच. १७ भोपळे. १८ ठाव पहाण्याचा वेळू. १९. क्वचित्. 1 -