पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तत्वज्ञान. पर्वतीं बैसका न संडावी । समुद्री रेखा नोलांडावी । पृथ्वीया भूते वाहावीं । हे आज्ञा माझी ॥ म्यां बोलविला वेद बोले । म्यां चालविला सूर्य चाले। म्यां हालविल्या प्राण हाले । जो जगाते चाळिता ॥ मियांचि नियमिलासांतां । काल ग्रासितसे भूतां। ... इये म्हणियागते पंडुसुता। सकळे जयाची॥ जो ऐसा समर्थ । तो मी जगाचा नाथ । आणि गगना ऐसा साक्षिभूत । तोही मीचि ॥ ज्ञा. ९. २८०-२८६. ३६. देवाचा जगताशी संबंध, इहीं नामरूपी आघवा । जो भरला असे पांडवा। आणि नामरूपांचाही वोल्हावा। आपणचि जो॥ जैसे जळाचे कल्लोळ । आणि कल्लोळी आथी जळ । ऐसेनि वसवीतसे सकळ । तो निवास मी ॥ जो मज होय अनन्य शरण । त्याचे निवारी मी जन्ममरण । यालागी शरणागतां शरण्य । मीचि एक ॥...॥ जैसा समुद्र थिल्लर न म्हणतां । भलतेथ बिंबे सविता। तैसा ब्रह्मादि सर्वा भूतां । सुहृद तो मी ॥ मीचि गा पांडवा। या त्रिभुवनासी वोलावा । सृष्टिक्षयप्रभवा । मूळ ते मी ॥ बीज शाखांत प्रसवे । मग ते रूखपण बीजीं सामावे। तैसे संकल्प होय आघवे । पाठी संकल्पी मिळे ॥ ऐसे जगाचे बीज संकल्प । अव्यक्त वासनारूप । तया कल्पांती जेथ निक्षेपं । होय ते मी ॥ ज्ञा. ९.२८३-२९३, - १ मर्यादा. २ चालन करणारा. ३ आज्ञा दिली असतां. ४ चाकर. ५आधार, बिन्हाळा. ६ डबकें. ७ सांठवले जाते. ८ ठेवणे. . ..