पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६३२ अर्जुना ऐसेनि पाहीं । आद्यंत ययासी नाहीं। माजि स्थिति आभासे कांहीं। परि टवाळ ते गा ॥ ब्रह्मगिरीहूनि न निगे । आणि समुद्रींही कीर न रिगे। तरि माजि दिसें वाउगे । मृगांबु जैसे ॥...॥ नाना रंगीं गजबजे । जैसे इंद्रधनुष्य देखिजे । तैसा नेणतयां आपंजे । आहे ऐसा ॥ ऐसेनि स्थितीचिये वेळे । भुलवी अज्ञानाचे डोळे । लाघुवी हरी मेखळे । लोक जैसा ॥...॥ एवं आदि ना अंतस्थिती। ना रूप ययासी आथी। आतां कायसी कुंथाकुंथी । उन्मूलनी गा ।।। आपुलिया अज्ञानासाठीं। नव्हता थांवला किरीटी । तरि आतां आत्मज्ञानाचिया लोटी"। खांडेंनि गा॥ वांचूनि ज्ञानेविण एके। उपाय करिसी जितुके । तिहीं गुंफसी अधिके । रुखी इये ॥ मग किती खांदोखांदीं। यया हिंडावे ऊर्वी अधीं। म्हणौनि मळचि अज्ञान छेदी । सम्यक्ज्ञाने ॥ येहवीं दोरीचिया उरंगा । डांगा मेळवितां पैगा। तो शिणचि वाउगा। केला होय ॥ तरावया मृगजळाची गंगा । डोणीलागी धांवतां दांगामाजि वोहळे बुडिजे मैं गा । साच जेविं॥ म्हणोनि स्वप्नींचेया भया । औषध चवोचि धनंजया। तेविं अज्ञानमूळा यया । ज्ञानचि खड्ग ॥ ज्ञा. १५.२२४-२५४. १ खोटी. २ निघणे. ३ शिरणे. ४ व्यर्थ. ५ भरे. ६ उत्पन्न होईल. ७ बहुरूपी. ८ फसवतो ९ कफनीने. १० पसरला. ११ तोड. १२ तरवारीने. १३ साप. १४ काठ्या. १५ नांव. १६ वन.