पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। ज्ञानेश्वरवचनामृत. [$१४ जैसा दीप ठेविला परिवरी । कवणात नियमी ना निवारी। आणि कवण कवणिये व्यापारी । राहाटे तेहि नेणे ॥ तो जैसा कां साक्षिभूतु । गृहव्यापारप्रवृत्तिहेतु। तैसा भूतकर्मी अनासक्तु । मी भूती असे ॥ ज्ञा. ९. ११०-१२९. १५. प्रकृतिपुरुषसंबंध. आतां असंगा साक्षिभूता । देहीं चैतन्याची जे सत्ता । तिये नाम पांडुसुता । चेतना येथ ॥ जे नखौनि केशवरी । उभी जागे शरीरी । जे तिहीं अवस्थांतरी । पालटेना ॥ मनबुद्धयादि आघवी । जियेचेनि टवटवी। प्रकृतिवनमाधवी । सदाचि जे ॥ जडाजडी अंशीं । राहाटे जे सरिसी। ते चेतना गा तुजसी । लटिके नाहीं॥ 4 रावो परिवार नेणे । आज्ञाचि परचक जिणे । कां चंद्राचेनि पूर्णपणे । सिंधु भरती ॥ ना ना भ्रामकाचे सन्निधान । लोहो करी सचेतन । कां सूर्यसंग जन । चेष्टवी गा॥ अगा मुखमेळेविण । पिलियाचे पोषण । करी निरीक्षण । कूर्मी जेवीं॥ पार्था तयापरी । आत्मसंगती इये शरीरीं। सजीवत्वाचा करी । उपयोग जडा॥ ज्ञा. १३. १३४-१४१. १ घरांत. २ सारखी. ३ लवाजमा. ४ कांसवी.