पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - H ६१६] तत्त्वज्ञान १६. प्रकृति पुरुषविवेक. ..... जया मार्गात जगीं । सांख्य म्हणती योगी। जयाचिये भाटिवेलागी । मी कपिल जाहालों ॥ तो आईक निर्दाख । प्रकृतिपुरुषविवेक। म्हणे आदिपुरुख । अर्जुनातं ॥ तरी पुरुष अनादि आथी। आणि तेचि लागोनि प्रकृति । सर्व सरिसी दिवोराती । जयापरी ॥...॥ तैसी जाण जवटें । दोन्ही इथे एकवटें। प्रकृतिपुरुषे प्रकट । अनादिसिद्ध ॥...॥ तरी केवळ जे सत्ता । तो पुरुष गा पंडुसुता। प्रकृती ते समस्तां । क्रिया नाम ॥...॥ ऐसेनि संतासंते । कर्म प्रकृतिस्तव होते। तयापासोनि निर्वाळते । सुखदुःख गा ॥ असती दुःख उपजे । सत्कर्मी सुख निपजे । तथा दोहींचा बोलिजे। भोग पुरुषा॥...॥ प्रकृतिपुरुषांची कुळवाडी । सांगतां असंगडी। जे आंबुली जोडी । आंबुला खाय ॥ आंबुलिया आंबुलिये । संगती ना सोये। की आंबुली जग विये । चोज ऐका ॥ जे अनंग तो पेंधा । निकवडा नुसंधा। जीर्ण अतिवृद्धा-1 पासूनि वृद्ध ॥ तया आडनांव पुरुष । येहवीं स्त्री ना नपुंसक। किंबहुना एक । निश्चयो नाहीं॥ तो अचक्षु अश्रवण । अहस्त अचरण । . TTTTTrimes . १ वर्णनासाठी. २ तेव्हांपासून. ३ बरोबर. ४ सारखी.:५ जुळी. ६ उत्पन्न होतें. ७ व्यापार, शेतकी. ८ अघटित. ९ स्त्री. १० पति. ११ संबंध. १२ नवल. १३ निराकार. १४ पांगळा. १५ दरिद्री. १६ एकटा.