पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६१३ तेथ देखोनि शफरे येरें । पोहो न लाहती॥ अरुण आंगाजवळिके । म्हणोनि सूर्यात देखे । मा भूतळीचि न देखे । सुंगी काई ॥ या लागी आम्हां प्राकृतां । देशिकार बंधे गीता। म्हणणे हे अनुचिता । कारण नोहे ॥ आणि बाप पुढां जाये । ते घेत पाउलाची सोये । बाळ ये तरी न लाहे । पावो कायी॥ तैसा व्यासाचा मागोवा घेत । भाष्यकारांते वाट पुसत । अयोग्यही मी न पवत । के जाईन॥ आणि पृथ्वी जयाचिया क्षमा । नुबगे स्थावरजंगमा। जयाचेनि अमृते चंद्रमा । निववी जग ॥ जयाचे आंगिक असिके । तेज लाहोनि अर्के । अंधाराचे सावाइके । लोटिजत आहे ॥ समुद्रा जयाचे तोय । तोया जयाचें माधुर्य । माधुर्या सौंदर्य । जयाचेनि ॥ पवना जयाचे बळ । आकाश जेणें पघळं । ज्ञान जेणे उज्ज्वळ । चक्रवर्ती ॥ वेद जेणे सुभास । सुख जेणे सोल्लास । हे असो रूपस ! विश्व जेणें ॥ तो सर्वोपकारी समर्थ । सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथ । राहाटत असे मजही आंत । रिघोनियां ॥ आतां आयती गीता जगीं । मी सांगे महाठिया 'भंगी। येथ के विस्मयालागीं । ठाव आहे ॥ श्रीगुरूचेनि नांव माती। डॉगरी जयापासीं होती। तेणे कोळिये त्रिजगतीं। येकवंद केली ॥ . १ लहान मासे. २ मग. ३ अयोग्य. ४ मार्ग. ५ लाभणे. ६ पत्ता, माग. ७ कंटाळत नाही. ८ समग्र. ९ साहाय्यक. १० विस्तृत. ११ रीत. १२ एकवट.