पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१३] प्रास्ताविक १३. ज्ञानेश्वराची स्वाभिमानपूर्ण नम्रता, म्हणोनि श्रीव्यासाचा हा थोर । विश्वासि जाला उपकार। जे श्रीकृष्णउक्ति आकार । ग्रंथाचा केला ॥ आणि तोचि हा मी आतां । श्रीव्यासाचीं पदें पाहातां । आणिला श्रवणपथा। महाठिया ॥ व्यासादिकांचे उन्मेखे । राहाटती जेथ साशंक । तेथ मीही रंक येक । वाचाळी करी ॥ परि गीताईश्वर भोळा । ले व्यासोक्तिकुसुममाळा । तरि माझिया दादळा । ना न म्हणे की॥ आणि क्षीरसिंधूचिया तटा । पाणिया येती गजघटा। तेथ काय मुरकुटा । वारिजत असे ॥ पांखफ़ेट पाखिरूं । नुडे तरी नभींच स्थिरू। गगन आक्रमी सत्वरू । तो गरुडही तेथ ॥ राजहंसाचे चालणें । भूतळी जालिया शहाणे । आणिके काय कोणे । चालावेचि ना॥ जी आपुलेनि अवकाशे । अगाध जळ घे कलशे । चुळी चूळपणा ऐसे । भरूनि न निघे॥ दिवटीच्या आंगी थोरी । तरि ते बहु तेज धरी। वाती आपुलिया परी । आणीच की ना॥ जी समुद्राचेनि पैसें । समुद्री आकाश आभासे। थिल्लरी थिल्लरापेसें । बिबेचि पैं ॥ तेविं व्यासादिक महामती । वावरों येती इये ग्रंथीं। मा आम्ही ठाको हे युक्ति । न मिळे कीर ॥ जिये सागरी जळचरें । संचरती मंदराकारें। ALL १ ज्ञान. २ बडबड. ३ धारण करतो. ४ गजसमुदाय. ५ पंख फुटतात न फुटतात असें. ६ विस्तार. ७ डबकें. ८ राहाटणे. ९ स्तब्ध बसणे. १० मंदार पर्वताच्या आकाराची.