पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रास्ताविक... की पुढिलांची दृष्टी चोरिजें । हा दृष्टिबंध निफजे । परि नवल लाघव तुझे। जे आपण चोरे ॥..... वेद वानूनि तंवचि चांग । जव न दिसे तुझे आंग। मग आम्हां तया मुंग। एके पांती॥...॥ कां उदयलिया भास्वत । चंद्र जैसा खद्योत । आम्हां श्रुति तुज आंत । तो पांड असे ॥...॥ या लागी आतां । स्तुति सांडूनि निवांता। चरणी ठेविजे माथा । हेचि भले॥ तरि तूं जैसा आहासि तैसिया। नमोजी गुरुराया। मज ग्रंथोद्यम फळावया । वेव्हारा होई ॥ ज्ञा. १४. १-१६. ९. श्रीगुरुपादपूजन. आतां हृदय हे आपुले। चौफाळूनिया भलें । वरी बैसऊं पाउले । श्रीगुरुचीं॥ ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेद्रियकुमळी । भरूनियां पुष्पांजुळीं । अर्घ्य देवों॥ अनन्योदके धुवट । वासना जे तनिष्ठ । ते लाविलेसे बोट । चंदनाचें ॥ प्रेमाचेनि भांगारे । निर्वाळुनि नेपुरें। लेववू सुकुमारे । पदें तिये ॥ धावली आवडी । अव्यभिचार चोखडी। तिये घालूं जोडी । आंगुळियां ॥ आनंदामोद बहुळ । सात्विकाचे मुकुळे। - १ नजरबंदी. २ मौन. ३ पंक्ति. ४ योग्यता. ५ सावकार. ६ चौरंग करून. ७ कळ्या. ८ सोनें. ९ दृढ झालेली. १० सुवास. ११ पुष्कळ. १२ कमळ..