पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- [६.६ ज्ञानेश्वरवचनामृत. तेथ जी जी महाप्रसाद । म्हणोनि साविया जाहला आनंद । आतां निरोपीन प्रबंध । अवधान दीजे ॥ ज्ञा. १२. १-१९. ७, गुरुकृपेचे महत्त्व. जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । ते वंदू श्रीचरण । श्रीगुरूचे ॥ जयांचेनि आठवे । शवसृष्टी आंगवे । सारस्वत आघवें । जिव्हेसि ये ॥ वक्तृत्व गोडपणे । अमृतातें पारुषं म्हणे । रस होती वोळगणे । अक्षरांसी ॥ भावाचे अवतरण । अवतरवी निजखूण । हातां चढे संपूर्ण । तत्त्वबोध ॥ श्रीगुरूचे पाय । जै हृदय गवसूनि ठाय । तैं येवढे भाग्य होय । उन्मेषांसी ॥ ज्ञा. १३. १-१. . ८. गुरूंचे अनिर्वर्णनीयत्व. जयजय आचार्या । समस्तसुरवाँ । प्रज्ञाप्रभातसूर्या । सुखोदया ॥ तूं जयांप्रति लपसि । तयां विश्व हे दाविसी। प्रकट तें करिसी । आघवेंचि तूं ॥ १ सहज. २ ग्रंथ. ३ लक्ष. ४ स्वाधीन होतें. ५ फिकें. ६ आश्रित. ७ अभिप्राय. ८ धरून, पोटाळून. ९ ज्ञान.