पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७ प्रस्तावना. एकदा अंगाची त्वचा टाकून सर्प पाताळी रिघाल्यावर त्या त्वचेची तो जशी काळजी करीत नाही, त्याप्रमाणे गुणातीतता प्राप्त झाल्यावर कमीकर्माचा मोह त्यास उत्पन्न होत नाही (क्र. १०६ ). या निखैगुण्यावस्थेतच विश्वाश्वत्थाचें छेदन होते, देहाहंतारूप म्यानांतून आत्मज्ञानरूपी तलवार बाहेर काढून ती प्रत्यग्बुद्धीच्या मुठीत धरावी; विवेकरूप सहाणेवर ती परजन निश्ययाचे एकदोन वेळ मुष्टिबळ पहावे व निदिध्यासाने हत्यार व आपण एक झाल्यावर खांडावयास घाव घालण्याजोगे दुसरे कांहींच न उरल्यामुळे अश्वत्थ वृक्षही आपोआप नाहीसा होईल (क्र. १०७). कामक्रोधलोमांच्या पलीकडे जाणे हेही एक प्रकारचे निस्त्रगण्यच होय. त्रिदोषांनी ज्याप्रमाणे शरीर सांडावें, अगर नगरांतून जसें त्रिकूट नाहीसे व्हावें, अगर अंतरांतून जसे त्रिदाह शमावे, त्याप्रमाणे हे कामादिक तीन शत्र निघुन गेले असता मोक्षमार्गास उपयोगी असा सज्जनांचा संग लाभतो; जेथें आत्मानंद सदा वसत आहे अशा प्रकारचे गुरुरूपेचे भवन आतां प्राप्त होते; प्रियाची अत्यंत सीमा जो. माउली परमात्मा त्याचे दर्शन होते; व त्याच्या संयोगानें संसाराचा गलबला आपोआप नाहीसा होतो. जो कामकोधलोमांस झाडून टाकील त्यासच अशा प्रकारचा मोठा लाभ प्राप्त होईल असे ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात (ऋ. १०८). साक्षात्कार. २१. येथपर्यंत आपण ज्ञानेश्वरीतील नीतिमीमांसा पाहिली. आतां नीतिमीमांसेचे ध्येय जो आत्मसाक्षात्कार त्याचा ज्ञानेश्वरांनी कसा मार्ग आंखला आहे ते आपण पाहूं. ज्ञानेश्वरांनी मुख्य पंथराज एकच कल्पिला आहे. या पंथराजास मिळणाऱ्या चार वाटांचे म्हणजे ज्ञान, ध्यान, कर्म, आणि भाक्त, यांचे त्यांनी क्रमांक ११० मध्ये थोडेबहुत दिग्दर्शन केले आहे. या सर्व वाटा ज्या पंथराजास मिळतात त्या मार्गावर अद्यापही महेश कापडीच होऊन राहिला आहे. याच मार्गाने मागचे महर्षि, साधक, सिद्ध व आत्मविद चालत गेले. हा मार्ग पाहिला असतां तहानभूक विसरून रात्र व दिवस यांमधील भेद नाहीसा होतो. या मार्गावर जेथे जेथे पाऊल पडते त्या त्या ठिकाणी मोक्षाची खाणच उघडते (क. १०९). परंतु अशा प्रकारचा मार्ग सर्वांसच साधत नाही. पुष्कळ लोक संसारांतच गुरफुटून जातात. या शतधा भोंकें असणाऱ्या नावेत रिघून ते निश्चिती कशी मानतात याचेच आश्चर्य वाटते. या