पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. चहूकडे जळत असलेल्या वणव्यातून बाहेर निघण्यास देवाच्या भक्तीवांचून दुसरें साधनच नाही (क्र. १११). या मृत्युलोकांत कधी सुखाची गोष्ट ऐकू आली आहे काय ! इंगळांच्या अंथरुणावर सुखाने निद्रा लागणे केवळ अशक्य आहे. ज्या लोकांतील चंद्रही क्षयरोगी आहे, जेथें उदयाचा अर्थ अस्त असाच होतो, जेथें पुढे गेलेल्यांचे पाऊल परत आलेले दिसतच नाही, जेथील पुराणे म्हणजे मृत लोकांची एक मोठी कहाणीच होय, त्या लोकांत नितिाने वागणे हे मोठे चमत्कारिच नव्हे काय ? जंव जंव बाळ वाढते तंव तंव ते मृत्यूच्या संनिधच जाते. आणि असे असूनही लोक येथे गुढ्या उभारतात. मरणे हा शब्द त्यांच्या कानांस कसासाच लागतो. एखादा मासे खात असलेला बेडूक त्याच क्षणी जसा सापाच्या जबड्यांत सांपडत असावा त्याप्रमाणे या लोकांची स्थिति आहे. येथून झडझडून बाहेर निघाल्यावांचन ईश्वराचे अव्यंग धाम मिळावयाचें नाहीं (क. ११२). ईश्वरप्राप्त्यर्थ कोणतीही दृढभावना असली तरी चालेल. मग ती नारदअक्रूरांची भक्ति असो, वसुदेवादिकांचे ममत्व असो, कंसाचे भय असो, अगर शिशुपालादिकांचा घातकधर्म असो (क्र. ११३). या जगांत दुराचारी मनुष्यासही साधु बनतां येते. असा दुष्कृती मनुष्य एकदां अनुतापतीर्थात न्हाऊन देवाच्या राउळांत रिघाला म्हणजे त्याचे सर्व कुळ पवित्र होतें (ऋ. ११४). अंत्यज असो, स्त्रिया असोत, शुद्र असो, अगर पशूही असो, ज्यास माझी भक्ति त्यास माझा साक्षात्कार ठरलेलाच आहे. नक्राने हत्तीचा पाय पकडला असता त्याने काकुळतीने माझें स्मरण केल्याबरोबर त्याचे पशुत्वच नाहीसे झाले. खैराची लांकडे अगर चंदनाची लांकडे यांचा भेद अग्नीमध्ये राहत नाही; ह्मणून कुळ जातिवर्ण ही सर्व भक्तीत निष्कारण होत (क. ११५). रूपानें, वयाने, अगर ज्ञानाने गजबजून जाऊन माझ्या भक्तीवांचन मनुष्य जिवंत राहील, तर निंबोण्याने युक्त निंबाचे झाड जसें कावळ्यांच्याच उपयोगी पडावे तशी त्यांची स्थिति होईल (क्र. ११६ ). खऱ्या भक्तीचे स्वरूप म्हणजे पर्जन्याची जसी संतत धार भूमीवर लागावी, अगर नदीने ज्याप्रमाणे आपली सकळ जलसंपत्ति घेऊन समुद्रास गिवसीत जावे, त्याप्रमाणे सर्वभावाने प्रेम धरवेनासे होऊन ईश्वराच्या आंत मिळून जाणे हेच होय (क. ११७). २२. अशाप्रकारची भक्ति मनुष्यांत प्रारंभी नसते. प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा परमभक्त जो अर्जुन त्याने याविषयीं जो आपला कबुलीजबाब दिला आहे तो ध्यानांत