पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

HT -J. ज्ञानेश्वरवचनामृत. तीर्थास जातो त्यास जसा मी तीर्थयात्रेस जात आहे असा अभिमान उत्पन्न होत नाहीं, अगर जो राजाचा शिक्कामोर्तब चालवितो त्यास जसा राजेपणाचा कुंज चढत नाहीं, अगर पुरोहितास दक्षिणा देत असतां जसा आपण यजमान आहो असा अभिमान उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे अहंकार सोडून आपण सर्व कर्मे करावी ( क. १०० ). ( 3 ) अहंकारत्यागाप्रमाणेच फलाशेचाही त्याग केला पाहिजे. खडकावर जसा पाऊस पडावा, अगर अग्नीवर जसें पेरावे, त्याप्रमाणे सर्व कर्माचा शन्यांत लय होऊ द्यावा. आत्मजेच्या विषयी जसा जीव निरभिलाष असतो, त्याप्रमाणे आपण फलाबद्दल निरभिलाष असावे (क्र. १०१). (४) आणि जी कम करावी ती सर्व ईश्वरप्रीत्यर्थ व ईश्वरार्पणबुद्दीने करावी. आपली कर्मे धुऊन देवाच्या हातांत दिल्यास ती भाजलेल्या बीजाप्रमाणे अंकुरदशेषत मुकतील (क्र. १०२). ज्याप्रमाणे रथ आपण सरळमार्गावर आहों, किंवा आडमार्गावर आहों, हैं जाणत नाही, त्याप्रमाणे कर्म व अकर्म या दोन्हीकडे स्पृहा न ठेवतां परमात्म्यास ती अर्पण करावी (१०३). स्वकर्मकुसुमांची पूजा ईश्वरास केल्यास अपारतोषाने ईश्वर आपल्या भक्तांस वैराग्यसिद्विरूप प्रसाद देतो, व त्यामुळे इतर सर्व फलें त्यांस वमनाप्रमाणे वाटतात ( क. १०४ ). - २०. नैष्कासिद्धि ही आणखी एका प्रकारे होते. सत्त्वरजतमांच्या पलीकडे जाऊन निखैगुण्य मिळविणे हीच नैष्कर्म्यसिद्धि. सत्त्वगुण सुद्धां पारध्यांप्रमाणे सुख व ज्ञान यांचे पाश टाकून एखाद्या मृगाप्रमाणे सात्त्विक कयास जाळ्यांत गोंवितो. रजोगुण तर ग्रीष्मांतींच्या वाऱ्याप्रमाणे, अगर कामिनीकटाक्षाप्रमाणे, अगर विजेच्या तेजाप्रमाणे अत्यंत चंचळ असून क्षणभरही विसांवा घेऊ देत नाही. तमोगुण हा जीवांचे मोहनास्त्रच होय. तमोगुणी मनुष्य जांभयांच्या परवडीत निमग्न असतो. त्याचे डोळे उघडे असूनही त्यास दिसत नाही; व हांक मारतांच तो ओ म्हणून उठतो. एखाद्या धाड्याप्रमाणे तो मुरकुंडी मारून सर्वदा पडलेला असतो; पृथ्वी पाताळास जावो, अगर आकाश वर येवो, उठणे हा भाव त्याच्या चित्तांत उत्पन्न होत नाही. जेथल्या तेथे लोळावे एवढेच त्यास वाटत असते; झोपेच्या सुखापुढे त्यास स्वर्गसुखही तुच्छ वाटते; वाटेत जात असतांही त्यास डोळा लागतो; व अमृतापेक्षाही तो निद्रेस श्रेष्ठ समजतो. या रजतमसत्त्वाच्या पलीकडे जाणे म्हणजेच निस्वैगुण्य मिळविणे. वसंत जसा वनलक्ष्मीस शिवत नाही, सूर्य जसा तारांगणांनी लोपावे व कमळांनी विकासावे हे जाणत नाही, त्याप्रमाणे त्रिगुणातीत हा कर्माकर्मापासून अलिप्त राहतो.