पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. २१ पोटांत सांठवितो, त्याप्रमाणे सर्व त्रिविधतापास सहन करणे हीच शांति (क्र. ६६). जगाशी आपली जुनाटच सोयरीक आहे असे समजून एखाद्या उमललेल्या कमलास ज्याप्रमाणे कानाकोपरा रहात नाही, त्याप्रमाणे आपल्या वर्तनांत कानाकोपरा न ठेवणे यासच ऋजुता म्हणावें (क्र. ६७ ). आचार्योपास्तीचें लक्षण सांगतांना ज्या देशांत गुरुगृह असेल तो देश कायम चित्तांत वसणे, स्वामीच्या भेटीवांचन निमिषही युगाप्रमाणे वाटणे, गुरुग्रामाचे कोणी आल्यास गतायुष्यास जीव जोडल्याप्रमाणे आनंद होणे, गुरुस माय कल्पून स्तन्यसुखाने त्याच्या अंकावर कदाचित आपण लोळणे, ज्या दास्याने संतुष्ट होऊन गुरु माग म्हणतील अशाप्रकारचे दास्य करण्याची इच्छा धरणें, देहांती आपल्या शरीराची मानी ज्या ठिकाणी गुरूचे चरण असतील त्या ठिकाणी मेळविण्याची इच्छा करणे, गुरुदास्थानं कश होऊन गुरुप्रेमामुळे पुष्ट बनणे, गुरुसांप्रदायधर्मावांचून वर्णाश्रमधर्म न जुमानणे, वक्त्राने गुरुनामाचे मंत्र सदा वाहणे, इत्यादि गोष्टी आचार्योपासनेमध्ये येतात (क. ६८). शुचित्व म्हणजे कापराप्रमाणे मन स्वच्छ करणे, बाहर कर्माने देह क्षालून आंत ज्ञानदीप लावणे, आंतील सद्भाव स्फटिकगृहींच्या दीपासारखे बाहेर स्वच्छ दिसणे, यास शुचित्व म्हणता येईल ( क. ६९). आकाशांतील अभ्रे, नक्षत्र, तारा, ग्रह वगैरे धावत असताही भ्रमणचक्रांत न भोवणाऱ्या ध्रुवाचा गुण तो स्थर्य होय (क्र. ७०). कामबागुल ऐकेल म्हणून अंतःकरण इंद्रियांच्या दारांत न ठेवणे, अगर एखाद्या व्यभिचारिणी स्त्रीस तिचा दांडगा पति बांधून ठेवितो त्याप्रमाणे आपल्या प्रवृत्तीवर टेहेळणी करणे, यास आत्मनिग्रह म्हणावे (क्र. ७१ ). ओकलेल्या अन्नाकडे पाहून ज्याप्रमाणे रसनेस लाळ स्त्रवत नाही, अगर एखादे प्रेत पाहून त्यास आलिंगन देण्यास जसा कोणी धजत नाही, त्याप्रमाणे विषयाबद्दल तिटकारा उत्पन्न होणे यास वैराग्य म्हणता येईल (क. ७२). सूर्याचा जसा निरभिमान उदयास्त होतो, अगर ऋतुकाळी फळून वृक्ष जसे फळलों असें जाणत नाहीत, त्याप्रमाणे हे कार्य मी केलें, अगर माझ्यामुळे सिद्धीस गेले, अशी वृत्ति मनांत उत्पन्न न होणे यासच अनहंकार म्हणावे (क्र. ७). जन्ममृत्युजरादुःखें ही अंगावर पडली नसतां दुरूनच त्याबद्दल भीति उत्पन्न होणे, उद्यांचा मुक्काम घातक आहे हे समजून आजच सावध राहणे, समर्थाशी हाडखाईर वैर पडले असतां आठहीपहर शस्त्र परजून राहणे, पद्मद्ळाशी आज सर्धा करणारे डोळे पुढे पिकलेल्या पडवळाप्रमाणे होतील हे समजून मनांत उद्वेग बाळगणे, हातपाय ।