पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. नीतिमीमांसा. १५. येथपर्यंत आपण ज्ञानेश्वरीतील मुख्य मुख्य तत्त्वज्ञानाचे मुद्दे पाहिले.. याच्यापुढे आपण ज्ञानेश्वरांनी ठिकठिकाणी आपल्या ग्रंथांत जी अत्युत्तम नीतिमीमांसा केली आहे तिजकडे थोडे लक्ष देऊ. ज्ञानेश्वरीतील अध्याय तेरा हा नीतिमीमांसेचा एक आकर आहे असे म्हटले तरी चालेल. ज्ञानेश्वरीतल्याप्रमाणे नीतिमीमांसा पाश्चात्य ग्रंथांतूनही क्वचितच आढळेल. उपमा, उदाहरणे, व दृष्टांत देऊन विषय हदयंगम करण्याची ज्ञानेश्वरांची शैली या नीतिमीमांसंत जितकी दृष्टीस पडते तितकी ज्ञानेश्वरीतही अन्यत्र क्वचित्रच दिसेल. अमानित्वाचे लक्षण करतांना ज्ञानेश्वरांनी असें लटले आहे की आपल्यास कोणी योग्यता अगर महत्त्व दिल्यास व्याधानें रंधलेल्या सृगाप्रमाणे आपण गजबजून जावं, आपली कीर्ति आपण कानांनी ऐक नये, व आपली भूज्यना डोळ्यांनी पाहं नये, कोणी आपल्यांस नमस्कार केल्यास तो मरणाचा मोबदलाच आहे असे समजावें, वाचस्पतीसारखी जरी आपली सर्वज्ञता असली तरी मोठेपणाच्या भीतीने आपण वेडिवेमध्ये दडावें. जगानें आपली अवज्ञा करावी, व सोयन्याधायन्यांनी आपला संबंधच तोडावा, अशी इच्छा. आपण धरावी. आपला संबंध वायु अगर गगन यांशी ठेवून झाडेझुडे ही आपल्यास प्राणापेक्षा जास्त आवडावी. हा अमानित्व गुणच 'अखंड अगवंता' या सदराखाली ज्ञानेश्वरांनी अध्याय ९ मध्ये वर्णिला आहे. हे सर्व जगच जर देवाचे स्वरूप आहे, तर त्यांत लहानमोठा हा भेद उरत नाही. उंचीवरून येणारे उदक जसे नम्रपणाने खाली येते, त्याप्रमाणे सर्व भूतजाताशी आपण नम्रतेने वागाचे (क. ६३). अदभित्व हा गुण आपले दानपुण्य वगैरे झांकून ठेवण्यामध्ये आहे. ज्याप्रमाणे एखादी कुलवधु आपलें अवयव लपविते, अगर एखादा रुषीवल आपलें पेरिलेलें झांकून ठेवितो, त्याप्रमाणे आपली सत्कृत्ये लपवून ठेवणे यासच अदभित्व म्हणावे (क्र. ६४). पाण्याच्या एका तरंगासही धका न लावणे, सर्व सृष्टीतील परमाणु हे लहान जीवच आहेत असे समजून कारुण्याने पाउले टाकीत जाणे, वाऱ्यास अगर आकाशासही धका लागेल या बुद्धीन आपले हात न हालविणे, अगोदर स्नेहपूर्ण दृष्टीने पाहून नंतर साच आणि मवाळ शब्द बोलणे, या व इतर अशाच रुति “अहिंसा" या सदराखाली येतात (क्र. ६५). नदीनदांचे समुदाय जळाचे लोट घेऊन आले असताही समुद्र त्यांस जसा आपल्या