पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. लुळे होण्याच्या अगोदरच आत्मज्ञान चिंतून ठेवणे, हे दोषदर्शन होय ( क्र. ७r ). एखादा अतिथि जसा बिढारांत बसावा त्याप्रमाणे आपल्या गृहांत वागणे, अगर आपली जी पुत्रकन्या असतील ती वृक्षातळी सहजगत्या बसणा-या गोरुवाप्रमाणे आहेत असे समजणे, यासच अनासक्ति म्हणावें ( क्र. ७५ ). शैलवृक्षांची कुहरें, जळाशय, व तपोवनादिकांवर प्रीति असून जनपदाची अखंड खंती बाळगणे यास 'एकांतप्रियता म्हणता येईल ( क. ७६ ). वल्लभापुढे रिघतांना पतिव्रता स्वीस कोणतेही सांकडे वाटत नाही, त्याप्रमाणे एकभावाने ईश्वरापुढे धावणे यासच अनन्यभक्ति म्हणावी ( क. ७७). व परमात्मवस्तूवांचन दुसऱ्या कोणत्याही गोष्टीच्या मागे धावणे ही भ्रांति आहे असे समजून ध्रुवाप्रमाणे निश्चल राहणे यास अध्यात्मज्ञान म्हणावें (क्र. ७८ ). अशा रीतीने ज्ञानेश्वरांनी अमानित्वादिगुणांची, अगर भगवद्गीतेत ज्यास ज्ञान म्हटले आहे त्यची, मीमांसा केली आहे. १६. ही जी ज्ञानाची लक्षणे सांगितली त्याच्या उलट सर्व लक्षणे अज्ञानाची होत. ज्ञानी मनुष्याप्रमाणेच अज्ञानी मनुष्याचे लक्षणही ज्ञानेश्वरांनी पुष्कळ उपमा व दृष्टांत देऊन केले आहे. पर्वताच्या शिखरावरून जसें एकाद्या मनुष्याने न उतरावे त्याप्रमाणे जो महत्त्वाच्या अद्रीवरून उतरत नाही त्यास अज्ञान म्हणावें. एखादा भाता जसा कुंकला असतां फुगतो, व सोडला असतां आकर्षण पावतो, त्याप्रमाणे संयोगवियोगांनी या अज्ञानी मनुष्याच्या मनांत भरतीओहोटी होत असते. ज्याप्रमाणे एखादा अरण्यांत असलेला कुवा कांट्यांनी किंवा हाडांनी भरलेला असावा, त्याप्रमाणे त्याचे मन विकल्प व संशय यांनी भरलेले असते. सिंह ज्याप्रमाणे चांगलें व वाईट पहात नाही त्याप्रमाणे हा स्त्रीविषयी काहींच विचार करीत नाही. असा अज्ञानी मनुष्य चांचल्याने मर्कटाचे भावंडच शोभतो. ज्याप्रमाणे एखादा पोळ मोकळा सुटावा,अगर ज्याप्रमाणे एखादें आंधळे हत्तीचें पोर इकडे तिकडे धांवत सुटावें, त्याप्रमाणे या मनुष्याचे मन विषयांत सैरावैरा धावते. एखाद्या अंत्यजास राज्यावर बसविलें असतां तो जसा अभिमानाने ग्रस्त होतो, अथवा एखाद्या अजगराने लांकूड गिळिलें असतां तो जसा ताठतो, त्याप्रमाणे हा अज्ञानी मनुष्य गर्वाने फुगलेला दिसतो. लाटण्याप्रमाणे न लवणे, व फत्तराप्रमाणे न द्रवणे, हे गुण त्याच्या अंगांत येतात; त्यास तारुण्याचे भुररें चढले असल्याने एखाद्या कड्यावरून सुटलेल्या धोंड्याप्रमाणे तो गडगडत खाली येतो. एखाद्या गारुड्याचे माकड असावें त्याप्रमाणे स्त्रीच्या छंदाने तो नाचता, व एखाद्या प्रेमयुक्त भक्तानें