पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. EET 4 . हा विष्ठारूप बनतो; या दोहीतूनही सुटला तर हा रुमीचा एक पुंज बनतो. याच्या उलट आत्मा हा नित्य शुद्ध असून “ सकळ ना निष्कळ, अक्रिय ना क्रियाशीळ, रुश ना स्थळ, अल्प ना बहुवस, रिता ना भरित, मूर्त ना अमूर्त, आनंद ना निरानंद” असा आहे. सृष्टि उत्पन्न झाली असता हा उत्पन्न होत नाहीं व सृष्टीचा व्यय झाला असतां याचा व्यय होत नाही. ज्याप्रमाणे आकाशांत अहोरात्रे यावीत, त्याप्रमाणे या आत्म्यावर देह येतात; तो मात्र जशाचा तसाच कायम राहतो ( क्र. २३). १०. या आत्म्याचा सत्त्वरजतमांशी संबंध आल्याने या शरीरांत असेपर्यंत त्याच्या क्रिया कशा होतात, व त्यांच्या संयोगामुळे मृत्यूनंतर त्याची गति कशी होते, याचे ज्ञानेश्वरांनी फार चांगले वर्णन केले आहे. सत्त्वाचे प्राबल्य शरीरांत असतांना कमल सोडून सुवास जसा बाहेर फांकावा, त्याप्रमाणे आल्याची प्रज्ञा बाहेर प्रकाशमान होते; व सवैद्रियांत विवेक राबत असून महानदी जशी वर्षाकाली उचबळत तशी बुद्धि शास्त्रजातामध्ये विस्तीर्ण होते. सत्त्वाचें बाहुल्य असतांना मृत्यु आल्यास आत्म्यास पुनः ज्ञान्यांमध्ये जन्म प्राप्त होतो; राजा डोंगरास गेला असता त्याचे रावपण जसें मोडत नाहीं, अगर दिवा कोठेही नेला असतां तो जसा प्रकाश पसरवितो, त्याप्रमाणे सत्त्वयुक्त आत्म्याची स्थिति सर्वत्र प्रकाशमानच असते. ज्यावेळेस शरीरांत रजोगुण वाढतो, तेव्हां सर्व इंद्रियें विषयांकडे मोकाट धांवतात; परदारादिकांचा प्रसंग पडल्यास विरुद्ध असा वाटत नाही; शेळी जशी खायाखाय विचारीत नाही, त्याप्रमाणे रजोगुणास विरुद्ध व अविरुद्ध कांही नसते. रजोगुणाचे लक्षण म्हटले म्हणजे काहीं तरी अचाट कामें करणे हे होय. एकादा मोठा प्रासाद बांधणे, अश्वमेध तडीस नेणे, नगरें व जळाशय निर्माण करणे, इत्यादि क्रिया रजोगुणामुळे होतात. हा रजोगुण वाढला असतां मृत्यु आल्यास राजमंदिरांत राहूनही जसा एकादा भिकारी असावा तशी याची स्थिति होते; कारण मोठ्या श्रीमंताच्या व-हाडाबरोबर जरी बैल गेला तरी त्याच्या नशिबींचा कडबा कधी चुकत नाही. ज्यावेळी शरीरांत तमाचे प्राबल्य होते तेव्हां अंतर्बाह्य अविवेकच माजतो; दुष्कृत्य करण्यास चित्तास उल्हास वाटतो. तामस मनुष्य मदिरा न घेतां डुलतो, व सन्निपातावांचून बरळतो. आणि तमाची वृद्धि झाली असतां मृत्यु आल्यास इहलोकीही आग आणि परलोकीही आग अशी स्थिति होते (क. २४). खरे पाहिले असतां आत्मा येत नाही व जात नाही; आत्म्याचा धर्म आत्म्यांत पाहणे, व