पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- A ज्ञानेश्वरवचनामृत. शरीराचा धर्म शरीरांत पाहणे हेच ज्ञानाचे चिन्ह होय. तारांगण समुद्रांत बिंबलें तरी ते तुटून जसे पाण्यात पडत नाही, तद्वतच चैतन्य देहांन प्रकट झाले तरी त्यापासून ने अलिप्तच राहतें (क्र. २६). . ११. ईश्वराचा जगताशी संबंध कसा आहे याचे वर्णन करीत असतांना ज्ञानेश्वरांनी गीतेतील मूळचे अश्वत्थाचे रूपक फारच विस्तृत रीतीने पुढे मांडून गीतेतील भाव आपल्या शब्दांनी व कल्पनांनी फारच विशद करून सांगितला आहे. विश्वरूपी अश्वत्थ हा इतर वृक्षांप्रमाणे खाली मुळे वर शाखा असा नसून, याचे मूळ ऊवात आहे व वाढ अधोमुख आहे, असें ज्ञानेश्वर म्हणतात (क्र.२७). या विश्वाश्वत्थाचे ऊर्ध्व ईश्वरस्वरूपांत आहे (क्र. २८), व त्याचा अधोमुख विस्तार सत् ना असत् स्वरूपाचा आहे. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये तरुणांगी आलिंगिलौनिवणि आलिंगून सकाम करते, त्याप्रमाणेच या स्वरूपामध्येही माया उत्पन्न होऊन जगद्रुप भासते (क्र. २९). हे जगत् म्हणजेच उद्यांपर्यंतही न टिकणारा अश्वत्थ. होय; वीज जशी क्षणोक्षणी पालटते, हालणाऱ्या पद्मदलावरील जळ जसें चंचळ असते, त्याप्रमाणेच या विश्वाश्वत्थाचीही स्थिति आहे. वेगातिशयाने भूमीवर फिरणारी भिंगोरी जशी अचल भासते, त्याप्रमाणेच हा संसारवृक्ष मोडत मांडत असूनही लोकांस अव्यय आहेसा वाटतो (क्र. ३०). या ठिकाणी या शिनसाळ झाडाचे उत्पाटन होणार कसे, असा प्रश्न उत्पन्न होणे साहजिक आहे. त्यास उत्तर इतकेंच आहे की, ज्याप्रमाणे मृगजळाच्या तळ्यावर साळींकेळी लावितां येणार नाहीत (क्र. ३१), अगर ज्याप्रमाणे व्योमकुसमांचा देंठ तोडतां येणार नाही, त्याप्रमाणेच या संसारवृक्षाचे खंडण करण्यास परिश्रम मुळीच लागत नाहीत. आत्मज्ञानावांचून हा अश्वत्थ तोडण्याचे जितके उपाय करावेत तितके सर्व व्यर्थ होत.. स्वप्नांत भय वाटल्यास त्यास औषध जशी जागृति, त्याप्रमाणे हा अश्वस्थवृक्ष तोडण्यास उपाय म्हणजे केवळ एक आत्मज्ञानच होय (क्र. ३२). या संसाराचे अश्वत्थरूपाने ज्याप्रमाणे वर्णन करितां येईल, त्याप्रमाणेच त्यास मायानदीचा दृष्टांतही देता येईल. या नदीस मोहाचा पूर आल्याने यमनियमांची नगरें इच्या जोरामुळे वाहून जातात. या नदीत द्वेषाचे मोठे भोवरे, मत्सराची आडवळणे, व प्रमादादि महामान आहेत. ही मायानदी तरण्यास जो जो म्हणून उपाय करावा, तो तो अपायच होतो. स्वयंबुद्धीच्या बाहूच्या जोरावर, वेदत्रयाची सांगड घालून, अगर अहंभावाची धोंड पकडून, हा मायासमुद्र तरून जाण्याची इच्छा केल्यास . -