पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. ज्ञानेश्वरवचनामृत. ९. प्ररुतिपुरुषविवेकाप्रमाणेच क्षराक्षरविवेक, क्षेत्रक्षेत्रज्ञविचार, अगर देहात्मविचार, हेही ज्ञानेश्वरीच्या तत्त्वज्ञानाचे पाये होत. यांपैकी क्षराक्षराचा विचार करतांना ज्ञानेश्वरांनी असे सांगितले आहे की, महत्तत्त्वापासून तो थेट तृणापर्यंत जे जे काहीं गुणत्रयाच्या टांकसाळीत निर्माण होते, व ज्यास जगत् अशी संज्ञा आहे; तसेच ज्याच्यावर क्षरपणाचा खोटाच आळ आलेला आहे, जो खळाळींच्या उदकावर न हालत असतांही हालणा-या चंद्राप्रमाणे दिसतो, व ज्यास जीव अशी संज्ञा आहे; ही दोन्ही मिळून क्षर पुरुष होत (क्र. १९). अक्षर पुरुष या जीवांच्या मध्यभागी गिरिवरांत जसा मेरु शोभावा त्याप्रमाणे शोभतो. सागर आदून गेल्यावर तरंग अगर पाणी कांहींच नसतांना जी अनाकार दशा प्राप्त होते, अगर सर्व कळा नाहीशा झाल्यावर ज्याप्रमाणे अमावस्येस चंद्र नाहीसा होऊन राहतो, त्याप्रमाणेच या अक्षर पुरुषाचे स्वरूप समजावे ( क्र. २०). या क्षर व अक्षर पुरुषांमध्ये एक आंधळा, वेडा, पंगु आहे, दुसरा सर्वांगसंपूर्ण आहे; परंतु हे एकाच ग्रामामध्ये राहात असल्याने त्यांचा संयोग घडला आहे. या दोहींखेरीज तिसराही एक पुरुष आहे, त्यास या दोघांचेही नाव सहन होत नसून तो उगवल्याबरोबर या दोहोंसही त्याच्या यामासकट खाऊन सोडतो; हा तिसरा पुरुष उत्तमपुरुष होय (क्र. १८ ). ज्याप्रमाणे वह्नि काष्ठ खाऊन शेवटी आपणच जळून जातो, ज्याप्रमाणे ज्ञानाने अज्ञान नाहीसे केल्यावर ते स्वतःच ज्ञानातीत बनते, ज्याप्रमाणे कल्पांतकाळी सर्व नदी'नदांस खाऊन टाकून एकार्णव आपली मर्यादा ओलांडून जातो, त्याप्रमाणे जागृत्, स्वप्न, सुषुप्तीच्या पलीकडची जी वस्तु तीच उत्तमपुरुष होय. जो प्रकाश्यावांचून प्रकाश आहे; जो ईशितव्यावांचून ईश आहे; जो विश्रांतीचा विश्राम, सुखाचे मुख, व तेजाचें तेज आहे; ज्याची उपमा ज्यासच योग्य आहे; असा पुरुष तो उत्तमपुरुष होय (क्र. २१). आतां क्षेत्रक्षेत्रज्ञाचा विचार करतांना पापपुण्य या शरीरांत पिकतें स्हणून या शरीरास आम्ही क्षेत्र म्हणतो, असें ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. रथांगाच्या मेळाव्यास जशी रथ ही संज्ञा प्राप्त होते, त्याप्रमाणे छत्तीसही तत्त्वे मिळून क्षेत्र होते ( क्र. २२ ). हा क्षेत्रक्षेत्रज्ञसंबंध म्हणजे जीवात्मसंबंधच होय. देह व आत्मा हे दोन्ही इतके भिन्न आहेत, की एकाचे तोंड पूर्वेकडे, तर दुसऱ्यांचे तोंड पश्चिमेकडे आहे. देह हा जणू काही काळानळाच्या कुंडांत घातलेल्या लोण्याच्या गोळ्याप्रमाणे आहे. माशी आपले पंख हालविते न हालविते, इतक्यांत हा नाहीसा होऊन जातो; अग्नीत पडला तर याचे भस्म होते; श्वानाच्या आधीन झाला तर