पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

--...... ६ १७८ ] - उपसंहार. २०१ तोचि गा विजयासि ठावी । येथ तुज कोण संदेहो। तेथ नये तरी वावो । विजयोचि होय ॥ म्हणौनि जेथ श्री श्रीमंत । जेथ तो पंडचा सुत । तेथ विजय समस्त । अभ्युदय तेथ ॥ जरी व्यासाचेनि साचे । धिरे मन तुमचे। तरी या बोलाचें। ध्रुर्वचि माना। जेथ तो श्रीवल्लभ । जेथ भक्तकदंब । तेथ सुख आणि लाभ । मंगळाचा ॥ या बोला आन होये । तरी व्यासाचा अंक न वाहे । ऐसे गाजोनि बाहे। उभिली तेणे ॥ ज्ञा. १८. १६३२-१६५९. . १७८. ईश्वराचें प्रसाददान. आतां विश्वात्मके देवें । येणे वाग्यज्ञे तोषावें। तोषोनि मज द्यावें । पसायदान है॥ जे खळाची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो। भूतां परस्परे पडो। मैत्र जीवांचे ॥ दुरिताचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो। जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥ वर्षत सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।। अनवरत भूतळीं। भेटो तयां भूतां॥ चलां कल्पतरूंचे आरव । चेतनां चिंतामणींचे ग्राव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ १ खोटा. २ सत्यत्व, अढळत्व. ३ शिष्यत्व, अंकितपण. ४ प्रसादाचे दान. ५ वक्रदृष्टी.. ६ पातकाचें. ७ अंधार. ८ समुदाय. ९ निरंतर, अखंड. १० चालत्या. ११ अंकुर. १२ सजीव.