पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० ज्ञानेश्वरवचनामृत. [६१७७ तयाचिये देशीच्या झाडीं। कल्पतरूते होडी। न जिणावे का येवढीं। मायबाप असतां॥ ते पाषाणही आघवे। चिंतारने का नोहावे। .... तिये भूमिके कां न यावें । सुवर्णत्व ॥ तयाचिया गांवींचिया। नदी अमृत वाहाविया। नवल काय राया। विचारी पां॥ तयाचे बिसाट शब्द । सुखे म्हणों येती वेद । सदेह सच्चिदानंद । कां नोहावे ते ॥ पैं स्वर्गापवर्ग दोन्हीं । इयें पदें तया अधीनीं। श्रीकृष्ण बाप जननी । कमळा जया ॥ म्हणौनि जिया बाहीं उभा। तो लक्ष्मीयेचा वल्लभा। तेथ सर्व सिद्धी स्वयंभा। येर मी नेणे ॥ आणि समुद्राचा मेघ । उपयोगे तयाहूनि चांग। तैसा पार्थी आजि लागे । आहे तये ॥ कनकत्वदीक्षागुरु । लोहा परीस होय कीरु। परि जगा पोसिता व्यवहारु । तेचि जाणे ॥ येथ गुरुत्वा येतसे उणे । ऐसे झणे कोणी म्हणे । वन्हि प्रकाश दीपपणे । प्रकाशी आपुला ॥ तैसा देवाचिया शक्ती । पार्थ देवासीच बहुतीं। परी माने इये स्तुती। गौरव असे ॥ आणि पुत्रे मी सर्वगुणीं। जिणावा हे बाप शिराणी। करी, ते शाईपाणीं। फळा आली ॥ किंबहुना ऐसा नृपा । पार्थ जालासे कृष्णकृपा। तो जयाकडे साक्षेपा । रीती आहे ॥ - 1 १ पैलेनें. २ भलते, अव्यवस्थित. ३ स्वर्ग व मोक्ष. ४ लक्ष्मी. ५ संबंध ६ आवड, इच्छा. ७ दक्षतापूर्वक