पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ ज्ञानेश्वरवचनामृत. [६ १७८ चंदमे जे अलांछन । मार्तड जे तापहीन । ते सर्वाही सदा सजन । सोयरे होतु ॥ किंबहुना सर्वसुखीं। पूर्ण होऊनि तिहीं लोकीं। भजिजो आदिपुरुषीं। अखंडित ॥ आणि ग्रंथोपजीविये । विशेष लोकीं इये। दृष्टादृष्टविजये । होआवे जी॥ येथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होइल दानपसावो। येणे वर ज्ञानदेवो । सुखिया जाला॥ ज्ञा. १८. १७९४-१८०२ १७९. एकनाथसंशोधन. श्रीशके पंधराशे साहोत्तरी । तारणनाम संवत्सरी। येकाजनार्दन अत्यादरीं । गीताज्ञानेश्वरीप्रति शुद्ध केली॥ ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध । परी पाठांतरी शुद्ध अबद्ध । तो शोधूनियां एवंविध । प्रति शुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी॥ नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका । जयाची गीतेची वाचिवां टीका। ज्ञान होय लोकां। अतिभाविकां ग्रंथार्थियां ॥ बहुकाळ पर्वणी गोमटी । भाद्रपदमास कपिलाषष्ठी। प्रतिष्ठानीं गोदातटीं । लेखनकामाठी संपूर्ण जाहाली॥ ज्ञानेश्वरीपाठी । जो ओंवी करील माहाटी। तेणे अमृताचे ताटीं । जाण नरोटी ठेविली ॥ 4 १ कलंकरहित २ दानप्रसाद. ३ मागाहून, अगर पाठांत.